JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / शाही जेवणापासून ते आईस्क्रीमपर्यंत.. फाशीच्या शिक्षेपूर्वी गुन्हेगारांनी व्यक्त केली हे पदार्थ खाण्याची इच्छा

शाही जेवणापासून ते आईस्क्रीमपर्यंत.. फाशीच्या शिक्षेपूर्वी गुन्हेगारांनी व्यक्त केली हे पदार्थ खाण्याची इच्छा

अंतिम इच्छा ही बाब प्रत्येक धर्मात महत्त्वाची मानली गेली आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये मृत्यूदंडापूर्वी गुन्हेगारांच्या काही अंतिम इच्छा तेथील नियमांनुसार पूर्ण केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 गुन्हेगारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मरण्यापूर्वी विचित्र पदार्थ (5 Weirdest Last Meal Requests On Death Row) मागितले होते.

0106

अनेक वर्षांपूर्वीपासून जगभरात भयंकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जात आहे. तथापि, असे अनेक देश आहेत, ज्यांनी मृत्युदंडावर बंदी घातली आहे. तुम्ही याचा कधी विचार केला आहे का, की ज्या लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे, ते मरण्यापूर्वी काय करतील, काय खातील, त्यांना काही खायची इच्छा (Criminals last food before death sentence) होईल की नाही? आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गुन्हेगारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मरण्यापूर्वी विचित्र गोष्टी (5 Weirdest Last Meal Requests On Death Row) मागितल्या होत्या. (प्रतिकात्मक फोटो: Canva)

जाहिरात
0206

जेम्स एडवर्ड स्मिथला (James Edward Smith) मार्च 1983 मध्ये खून आणि चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याने मृत्यूपूर्वी खाण्यासाठी माती मागवली होती. मर्डरपीडिया वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, त्याला आपल्या शरीरावर माती लावायची होती. जेणेकरून, आत्मा त्याचं शरीर सोडून दुसऱ्या जगात जाऊ शकेल आणि भूत बनणार नाही. त्याचा असा विश्वास किंवा श्रद्धा होती. मात्र, त्याची ही मागणी फेटाळून त्याला जेवणात दही देण्यात आलं. (प्रतिकात्मक छायाचित्र: Canva)

जाहिरात
0306

1963 मध्ये अमेरिकेच्या व्हिक्टर हॅरी फेगुअरला (Victor Harry Feguer) खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अमेरिकेच्या आयोवा राज्यात फाशीच्या शिक्षेशी संबंधित हे शेवटचं प्रकरण होतं. मीडियम वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, त्याने मरण्यापूर्वी फक्त एक ऑलिव्ह फळ (Olive) खाण्याची मागणी केली होती. या फळामध्ये बिया असायला हव्यात, अशी त्याची मागणी होती. त्याची इच्छा होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातून एक ऑलिव्ह रोप अंकुरित होईल आणि वाढेल. जे शांततेचं प्रतीक बनेल. (फोटो: Twitter/@AgentePolilla)

जाहिरात
0406

1995 मध्ये अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटात 168 जणांचा मृत्यू झाला होता. मीडियम वेबसाईटच्या वृत्तानुसार, स्फोटातील मुख्य आरोपी टिमोथी मॅकवे (Timothy McVeigh) याला धोकादायक इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्यात आला होता. तेव्हा तो फक्त 33 वर्षांचा होता. त्याने मरण्यापूर्वी मिंट चॉकलेट चिप्स आणि आईस्क्रीम खाण्याची मागणी केली होती, जी पूर्ण करण्यात आली. (फोटो: Twitter/@mrsunshine44)

जाहिरात
0506

स्टीव्हन मायकेल वूड्स ज्युनियरला (Steven Michael Woods Jr.) ड्रग डीलर आणि त्याच्या पत्नीच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2004 मध्ये, वुड्स हत्येचा आरोप असलेल्यांच्या अधिकारांसाठी लढत होता. 2011 मध्ये त्याला इंजेक्शन देऊन मारण्यात आलं होतं. त्याने अखेरच्या जेवणात 2 पौंड खारवून वाळवलेलं डुकराचं मांस (बेकन), 4 मीट पिझ्झा लार्ज, 4 फ्राईड चिकन, पेप्सी, माउंटन ड्यू, रूट बिअर आणि गोड चहाचे प्रत्येकी दोन ग्लास, दोन आइस्क्रीम, 5 चिकन फ्राईड स्टीक, बेकनसह दोन हॅम्बर्गर, फ्राईज आणि खूप साऱ्या गार्लिक ब्रेड स्टीक ब्रेड स्टिक मागितल्या होत्या. (फोटो: Twitter/@the_memorypage)

जाहिरात
0606

रॉनी ली गार्डनरला (Ronnie Lee Gardner) 1985 च्या खून खटल्यात दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2010 मध्ये अमेरिकेतील उटाह येथे त्याला गोळ्या घालून मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने शेवटची इच्छा म्हणून लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपट पाहण्याची आणि तो पाहताना शेवटच्या जेवणासाठी स्टीक, लॉबस्टर टेल, अॅपल पाय, व्हॅनिला आइस्क्रीम खाण्याची मागणी केली होती, जी पूर्ण झाली. (फोटो: Twitter/@twistedhistory)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या