धर्मेंद्र कुमार शर्मा/जयपूर, 02 जुलै : प्राण्यांना 4 पाय असतात हे तुम्हाला माहितीच आहे. पण त्यांचे इतर अवयव म्हणजे कान, डोळे हे माणसांसारखेच दोन आणि नाक, तोंड एक असतं. पण कधी चार पायांच्या प्राण्याला चार डोळे आणि दोन तोंड असल्याचं पाहिलं आहे. सध्या असाच एक विचित्र प्राणी चर्चेत आला आहे. राजस्थानमध्ये चार डोळे, चार शिंगं आणि दोन तोंडाचं रेडकू जन्माला आला आहे. राजस्थानच्या करौलीतील पुरा गावात म्हशीने विचित्र रेडकुला जन्म दिला आहे. म्हशीच्या या विचित्र रेडकाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या म्हशीचा मालक रूपसिंह मालीने सांगितलं की, म्हशीने वर्षभरापूर्वीही एका रेडकुला जन्म दिला होता पण एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. आता सहा दिवसांपूर्वी म्हशीने दुसऱ्या रेडकुला जन्म दिला. ज्याची दोन तोंडं, चार डोळे आणि चार शिंगं आहेत. बाकी त्याचं शरीर सामान्य आहे. दोन तोंड आणि चार डोळे असल्याने त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. रेडकू अस्वस्थ असल्याने त्याला आपल्या आईचं दूधही पिता येत नाही आहे. संपूर्ण कुटुंब त्याची सेवा करत आहे. हे वाचा - मगरीने पिल्लाला जबड्यात धरलं, वाचवण्यासाठी आईने पायाखाली तुडवून मारलं; पाहा VIDEO करौलीतील पशुतज्ज्ञ मुंशीलाल यांनी सांगितलं की, गर्भधारणेवेळी दोन बीज एकत्र जुळल्याने भ्रूणाचा पूर्ण विकास होत नाही. त्यामुळे असे विचित्र प्राणी जन्माला येतात. असे प्राणी जगण्याची शक्यता खूपच कमी असते.