प्रतीकात्मक फोटो
वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : ब्रेस्टबाबत बऱ्याच महिला सजग असतात. म्हणजे ब्रेस्टचा आकार लहान असला तरी तो मोठा किंवा विशिष्ट आकारात करण्यासाठी सर्जरी करवून घेतल्या जातात. असं असताना एका महिलेने मात्र आपले दोन्ही ब्रेस्ट मुद्दामहून काढून टाकले आहेत. सामान्यपणे ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो शरीराच्या इतर भागात पसरू नये, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी म्हणून ब्रेस्ट काढले जातात. पण या तरुणीच्या बाबतीत असं काही नव्हतं. तिला ब्रेस्ट कॅन्सर नव्हता. पण तरी तिने आपले ब्रेस्ट काढून घेतले. स्टेफनी जर्मिनो असं या महिलेचं नाव आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणारी 28 वर्षांची स्टेफनी द बूबलेसबेब म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षीच स्टेफनीने डबल मास्टेक्टॉमी करवून घेतली. म्हणजे तिने आपले दोन्ही ब्रेस्ट काढून घेतले. स्टेफनीला ब्रेस्ट कॅन्सर नव्हता पण ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होता. वयाच्या 15 व्या वर्षापासून तिला आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आहे, याची माहिती होती. जेव्हा ती 27 वर्षांची झाली तेव्हा तिच्यात BRCA1 जीन म्यूटेशन झाल्याचं निदान झालं. तिची 77 वर्षांची आजी टेरेसा आणि 53 वर्षांची आई ग्रॅब्रिएलासुद्धा BRCA1 पॉझिटिव्ह होत्या. BRCA1 जीन म्यूटेशन ब्रेस्ट कॅन्सरचा धोका निर्माण करतो. सर्व महिलांमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन असतात पण ज्या महिलांमध्ये या जीनमध्ये बदल होतो, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. आपल्यातही BRCA1 जीन म्युटेनश झाल्याचं समजताच कॅन्सरचा धोका वाढू नये म्हणून तिने हे पाऊल उचललं. हे वाचा - तुमच्या मुलांना तर तुम्ही दिलं नाहीये ना हे खेळणं? 4 वर्षांच्या चिमुकलीच्या आतड्यांना पडले छिद्रच छिद्र एका मुलाची आई असलेली स्टेफनी म्हणते, माझ्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री होती याची माहिती मला होती. माझ्या आजीला दोनदा हा कॅन्सर झाला होता, तेव्हा मी 15 वर्षांचे होते. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की ती BRCA1 जीन पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मला जास्त धोका होता. मला ब्रेस्ट आणि ओव्हेरिअन कॅन्सर होण्याची शक्यता 87 टक्के होती. ब्रेस्ट काढल्यानंतर बऱ्याच महिला ब्रेस्ट इम्प्लांट करवून घेतात. पण तिने त्याऐवजी फ्लॅट चेस्ट ठेवण्याचा निर्णय घेतला. स्टेफनी सांगते, ब्रेस्ट इम्प्लांटबाबत बराच विचार केल्यानंतर मी चेस्ट फ्लॅट ठेवण्याचा निर्णय घेतला. माझ्या स्तनांनी माझ्या मुलाला ब्रेस्टफिडिंग करून आपली जबाबदारी पूर्ण केली आहे, असं मला वाटतं. ब्रेस्टकडे मी महिलेची ओळख म्हणून पाहिलं नाही. उलट मी असेच आनंदी आणि आत्मविश्वासी आहे. यामुळे मी अनोखी दिसते आणि मला त्यामुळे ब्रेस्ट कापण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण नव्हता. हे वाचा - हौस म्हणून महिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप गेल्या वर्षी ब्रेस्ट कापल्यानंतर स्टॅफनी आपल्या या प्रवासाबाबतचा अनुभव आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. BRCA जीनबाबत जनजागृतीही करते.