JOIN US
मराठी बातम्या / Viral / Ratan Tata : रतन टाटांचा 25 वर्ष जुना फोटो व्हायरल, नक्की काय आहे फोटोत ज्यामुळे होतोय कौतुकाचा वर्षाव

Ratan Tata : रतन टाटांचा 25 वर्ष जुना फोटो व्हायरल, नक्की काय आहे फोटोत ज्यामुळे होतोय कौतुकाचा वर्षाव

जुन्या आठवणी प्रत्येकासाठी खूप खास असतात. मग तो सामान्य माणूस असो किंवा कुठला सेलिबिटी. अनेकवेळा लोक आपले जुने फोटो व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

जाहिरात

रतन टाटा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी : जुन्या आठवणी प्रत्येकासाठी खूप खास असतात. मग तो सामान्य माणूस असो किंवा कुठला सेलिबिटी. अनेकवेळा लोक आपले जुने फोटो व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. सोशल मीडियावर असे फोटो लगेच व्हायरल होऊन ट्रेंड बनतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांचं लक्ष वेधत आहे. हा व्हायरल होणारा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा आहे. रतन टाटा यांनी हा 25 वर्षे जुना असलेला फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी त्यांची खास आठवणही शेअर केली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘आजच्या दिवशी 25 वर्षापूर्वी टाटा इंडिकाने भारतात स्वदेशी प्रवासी कार उद्योगाला जन्म दिला.’

संबंधित बातम्या

पोस्ट शेअर केल्यापासून, त्याला असंख्य लाइक्स मिळाले आहेत आणि पोस्ट व्हायरल झाली आहे. पोस्टला सुमारे 27 लाख लाइक्स मिळाले आहेत आणि ही संख्या वाढत आहे. शेअर केल्यानंतर लोकांनी मजेशीर कमेंट्सद्वारे या कारबद्दलचे प्रेम दाखवले आहे. एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले - हे प्रेम 25 वर्षांपासून अबाधित आहे! दुसर्‍या वापरकर्त्याने टाटा यांचे ‘दूरदर्शी’ असे वर्णन केले आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी पोस्टवर त्यांचा आदर व्यक्त केला आहे.

दरम्यान, टाटा इंडिका 1998 मध्ये लाँच झाली होती. डिझेल इंजिन असलेली ही पहिली भारतीय हॅचबॅक कार होती. त्याने भारतीयांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले की आजही कायम आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये टाटा इंडिकाला स्थान मिळाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या