Son of Sultan Bull : मराठा प्रदीप तुर्णा यांनी मुर्रा जातीचा रेडा तयार केला आहे. दोघांमध्ये इतका लळा आहे की चांद नावाचा रेडा प्रदीपचा आवाज ऐकून अगदी घरच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचतो. त्याचबरोबर प्रदीप यांच्याकडून या रेड्याला विविध सुविधाही देण्यात आलेल्या आहेत. पाहा PHOTOS
सुलतान नावाच्या या रेड्याचं अपत्य असलेल्या चांद नावाचा हा रेडा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. सुलतानप्रमाणे तो स्पर्धेतही चॅम्पियन बनत आहे. अलीकडेच पंजाबमधील जगराव मंडी येथे आयोजित PDFA आंतरराष्ट्रीय डेअरी आणि अॅग्री एक्स्पो चॅम्पियनशिपमध्ये सुमारे 3000 पशु पालक पोहोचले होते. या स्पर्धेत सर्वात लहान असूनही चांद ने विजेतेपद पटकावले.
चांद या रेड्याचा जन्म 11 मे 2018 रोजी झाला होता. त्याची उंची 5 फूट 10 इंच, लांबी 15 फूट आणि वजन 7 क्विंटल आहे. त्यानं या आधीही अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत.
हरयाणात रेड्यांच्या स्पर्धेची पार क्रेझ आहे. त्यामुळं आता सुलतान या रेड्यानंतर चांदचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
प्रदीपचा एक इशारा रेड्याला जागेवरून उठवण्यासाठी पुरेसा आहे. त्याला त्याचा आहार आणि दिनचर्या ही पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार सेट केलेली आहे. त्याचबरोबर त्याला दररोज पाच किलोमीटरची पायपीटही प्रदीप करवून आणतात.
हा रेडा दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करतो आणि उन्हाळ्यात थंड हवेत गादीवर झोपतो. दक्षिण आफ्रिकेच्या एका व्यावसायिकाने सुलतानवर 21 कोटी रुपयांची किंमत लावली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
या चांद नावाच्या रेड्याची किंमत अजूनही कोटींमध्ये असल्याचं मानलं जात आहे. कारण या आधी सुलतान नावाच्या रेड्याची किंमत ही 21 कोटी रूपये एवढी लावण्यात आलेली होती.