JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'महिन्याला 2 लाख सॅलरी देतो पण अशीच GF हवी', पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी चक्क जाहिरात दिली

'महिन्याला 2 लाख सॅलरी देतो पण अशीच GF हवी', पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी चक्क जाहिरात दिली

होणाऱ्या गर्लफ्रेंडसाठी दोन तरुणांनी पगारही ऑफर केला आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँकॉक, 22 सप्टेंबर : आधी एकमेकांना भेटल्यानंतर मैत्री आणि त्यांच रूपांतर प्रेमात व्हायचं. आता सोशल मीडियावरही लाइफ पार्टनर शोधला जातो. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड शोधण्यासाठी बऱ्याच डेटिंग साइट्स, अॅप आहेत. पण दोन पठ्ठ्यांनी मात्र गर्लफ्रेंड मिळवण्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यांनी गर्लफ्रेंडसाठी चक्क जाहिरात दिली. तिला महिन्याला दोन लाख रुपये पगाराची ऑफरही दिली. गर्लफ्रेंड बनण्याच्या जॉबची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. थायलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन चिनी मित्रांसाठी ही जाहिरात दिली. आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिने ही जाहिरात पोस्ट केली.  तिने आपल्या ओके माई माई फेसबुक पेजवर गेल्या आठवड्यात ही पोस्ट केली. हे वाचा -  म्हणे, ‘कृपा करून…’; बड्या उद्योगपतीने शेअर केलेली Matrimonial Ad सोशल मीडियावर तुफान Viral या पोस्टमध्ये म्हटलं आहे, माझ्या दोन चिनी मित्रांसाठी गर्लफ्रेंड शोधत आहोत. तिचं वय  18 ते 23 वर्षांदरम्यान असावं. तिला महिन्याला 2.16 लाख रुपये पगार दिला जाईल. जर त्यांना तिनं तिचं काम नीट केलं आणि माझ्या मित्रांना तिचं काम आवडलं तर तिला पगारापेक्षाही अधिक पैसे मिळतील. दोघंही माझे मित्र आहे. ते अतिशय चांगले आहेत. आता फक्त गर्लफ्रेंड होण्यासाठी महिन्याला दोन लाख रुपये मिळत असतील तर ते सहजासहजी कसे बरे मिळतील. यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत.  या जॉबसाठी इच्छुक असलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज व्यसन नसावं. ती कामात चांगली असावी. तिला कोणतीही अडचण किंवा समस्या नसावी आणि महत्त्वाचं म्हणजे तिला चिनी भाषा बोलता यायला हवी, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ही पोस्ट पाहिल्यानंतर थायलँडमधील बऱ्याच महिलांनी या जॉबसाठी अप्लाय केलं. पोस्टवर प्रतिक्रिया देत बऱ्याच महिलांनी आपण या जॉबसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं.  काहींनी कमेंट बॉक्समध्ये चिनी शब्द वापरत तिथंच  आपल्या चिनी भाषेचं ज्ञानही दाखवलं. तर काहींनी आपल्या मैत्रिणींना ही पोस्ट टॅग केली. हे वाचा -  ट्र्रॅफीक जाममध्ये अडकलेल्या तरुण-तरुणीचं जुळलं प्रेम, जोडप्याची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही आज तक ने thethaiger च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीची पोस्ट आता सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे. कारण गर्लफ्रेंडच्या नोकरीसाठी कँडिडेट मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या