JOIN US
मराठी बातम्या / विदेश / शी जिनपिंग यांनी घडवला इतिहास, तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्रपती

शी जिनपिंग यांनी घडवला इतिहास, तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्रपती

China Xi Jinping : माओत्से तुंग यांच्यानंतर चीनमधील सर्वात ताकदवान नेता म्हणून जिनपिंग यांनी आपली देशावरची पकड मजबूत केलीय.

जाहिरात

xi jinping

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 10 मार्च :  शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती बनले. राष्ट्रपती म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा कार्यकाळ स्वीकारत त्यांनी इतिहास घडवला. जिनपिंग यांच्या राष्ट्रपती होण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. कारण त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार नव्हता. माओत्से तुंग यांच्यानंतर चीनमधील सर्वात ताकदवान नेता म्हणून जिनपिंग यांनी आपली देशावरची पकड मजबूत केलीय. जिनपिंग यांच्या बाजूने झालेलं मतदान जवळपास एक तास सुरू होतं. इलेक्ट्रिक मतमोजणी १५ मिनिटात पूर्ण झाली. शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी सर्वांच्या सहमतीने मते मिळाली. संसदेचे नवे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी तर उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड झाली. २०१८ मध्येच जिनपिंग यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या हालचाली केल्या होत्या. राष्ट्रपती होण्यासाठी असलेल्या कालावधीच्या मर्यादा त्यांनी संपुष्टात आणल्या होत्या. त्यामुळे आणखी एक कार्यकाळ मिळण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे महासचिव म्हणून पुन्हा नियुक्ती झाली होती. तेव्हाच पुन्हा एकदा जिनपिंग राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या