JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 11 दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम!

11 दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम!

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध (Israel-Hamas conflict) अखेर थांबले आहे. या युद्धामुळे गाझा शहराचं (Gaza City) मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या (Israel) अनेक भागातील रोजचे व्यवहार ठप्प झाले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गाझा, 21 मे : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध (Israel-Hamas conflict) अखेर थांबले आहे. या युद्धामुळे गाझा शहराचं (Gaza City) मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या (Israel) अनेक भागातील रोजचे व्यवहार ठप्प झाले होते. या युद्धात  200 पेक्षा जास्त जण मारले गेले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आहे. हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेकडून आलेल्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, असे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये आले आहे. नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने इस्रायलचे सैन्य प्रमुख आणि प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर युद्धविराम करण्याची घोषणा केली आहे. “या ऑपरेशनमध्ये मिळालेलं यश अभुतपूर्व आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचं आकलन केल्यानंतर भविष्यातील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल,’’ असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. हे वक्तव्य म्हणजे हमास या दहशतवादी संघटनेला इशारा असल्याचे मानले जात आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार या युद्धामध्ये 65 मुलं आणि 39 महिलांसह किमान 230 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1,710 जण जखमी झाले आहेत. दुसरिकडं इस्रायलमध्ये 2 मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेकडून स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी देखील इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविरामाला दुजोरा दिला आहे. बायडेन यांनी या निर्णयाबद्दल इस्रायलची प्रशंसा केली आहे. त्यांनी यापूर्वी दहशतवादी हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिला होता. “माझ्या मते आपल्याला पुढे जाण्याची ही चांगली संधी आहे. मी या विषयावर काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.” असे बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव Covid लॅब उद्धवस्त इस्रायलमध्ये यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये नेतन्याहू यांना स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. त्यांच्या विरोधकांना पर्यायी सरकार बनवण्यासाठी 2 जूनपर्यंत मुदत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलनं केलेल्या युद्धबंदीच्या वेळेला विशेष महत्त्व आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या