JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / महिलेने दिला साडेसहा किलो वजनाच्या मुलाला जन्म, रुग्णालयाला ऑर्डर करावं लागलं स्पेशल डायपर

महिलेने दिला साडेसहा किलो वजनाच्या मुलाला जन्म, रुग्णालयाला ऑर्डर करावं लागलं स्पेशल डायपर

Arizona येथील बॅनर थंडरबर्ड मेडिकल सेंटरमध्ये (Banner Thunderbird Medical Center) 4 ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या एका चिमुकल्याने सर्वांनाच हैराण केलं. कॅरी पटोनाइने (Cary Patonai) 38 आठवड्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये आपला तिसरा मुलाला फिनली (Finnley) याला जन्म दिला. जन्म झाला त्यावेळी फिनलीचं वजन साडे सहा किलो होतं. त्यांची उंची 23.75 इंच होती. या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की 27 वर्षांच्या करियरमध्ये कधीही इतक्या मोठ्या मुलाला पाहिलं नाही.

0106

कॅरी पटोनाइला अचानक लेबर पेन सुरू झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 4 ऑक्टोबर रोजी कॅरीने 38 आठवड्यांनंतर फिनलीला जन्म दिला.

जाहिरात
0206

कॅरीला सी सेक्शनसाठी नेण्यात आलं. त्यानंतर तिने साडे सहा किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला.

जाहिरात
0306

या बाळाचं वजन, त्याचा इतका मोठा आकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. याआधी त्यांनी कधीही इतकं मोठं बाळ गर्भातून बाहेर येताना पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जाहिरात
0406

सर्वसाधारणपणे बाळाच्या जन्मावेळी त्याचं वजन जवळपास दोन ते अडीच किलो असतं. परंतु फिनलीचं वजन साडे 6 किलो होतं. त्याला पाहून सर्वच जण हैराण झाले.

जाहिरात
0506

फिनलीला पाहिल्यानंतर मेडिकल टीमला त्याच्यासाठी स्पेशल डायपर ऑर्डर करावे लागले, कारण त्यांच्याकडे डायपरची इतकी मोठी साइजच नव्हती.

जाहिरात
0606

फिनलीसाठी जन्मानंतर घालण्यासाठी लागणारे कपडेही पुन्हा आणावे लागले. ज्या साइजचे कपडे आणले होते, ते त्याला होत नसल्याने पुन्हा नवीन कपडे मागवावे लागले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या