JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मस्कचं 'एक्स'शिवाय पानही हलत नाही; मुलांची नावं ते ट्विटरपर्यंत, सगळीकडं X, कारण काय?

मस्कचं 'एक्स'शिवाय पानही हलत नाही; मुलांची नावं ते ट्विटरपर्यंत, सगळीकडं X, कारण काय?

तुम्ही एलॉन मस्कच्या इतर कंपन्यांची आणि त्याच्या आयुष्यातील व्यक्तींची नावं पाहिलीत, तर तुम्हाला कळेल की त्याचं इंग्रजी ‘एक्स’ या अक्षरावरील प्रेम खूप जुनं आहे.

जाहिरात

मुलांची नावे ते ट्विटर सगळीकडे एक्स, मस्कच्या या निर्णयाचं कारण काय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जुलै : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कनं ट्विटरचा लोगो बदलून इंग्रजीतील X असा केला आहे. अनेकांना वाटत असेल की हा अचानक झालेला बदल आहे पण तसं नाही. जर तुम्ही एलॉन मस्कच्या इतर कंपन्यांची आणि त्याच्या आयुष्यातील व्यक्तींची नावं पाहिलीत, तर तुम्हाला कळेल की त्याचं इंग्रजी ‘एक्स’ या अक्षरावरील प्रेम खूप जुनं आहे. या प्रेमामागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यानं स्वत: यावर कधी याबाबत चर्चा केलेली नाही. पण, जे लोक मस्कला जवळून ओळखतात ते मस्कच्या एक्स प्रेमाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतात. ट्विटरचा लोगो बदलण्यापूर्वी मस्क यांनी ट्विटरचा ब्रँड X मध्ये रुपांतरित करणार असल्याचं सांगितलं होतं. मस्कनं X चं वर्णन सर्व लोकांच्या आत असलेल्या कमतरतांचं प्रतीक म्हणून केलं आहे, ज्या आपल्याला इतरांपेक्षा अद्वितीय बनवतात. कॅनडियन कलाकार क्लेअर बाउचर, जी मस्कच्या दोन मुलांची आई आहे ती म्हणते की, तिच्या एका मुलाचं नाव X ठेवलं आहे कारण ते बीजगणितमध्ये असं काहीतरी दर्शवतं ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही (उदा - या समीकरणात X चं मूल्य शोधा). लेखक लिओन एफ. सेल्झर स्पष्ट करतात की, मस्कला X हे अक्षर आवडतं कारण ते अनेक गोष्टींसाठी प्रतीक म्हणून वापरलं जाऊ शकतं. X हे अक्षर जीवन किंवा मृत्यूसाठी, वाढवण्यासाठी (गुणाकार) किंवा काहीतरी काढून टाकण्यासाठी (रद्द करण्यासाठी) आणि काहीच नसल्यापासून ते सर्वकाही असण्यापर्यंत, अशा प्रत्येक परिस्थितीसाठी वापरलं जाऊ शकतं. मस्कनं 1999 मध्ये पेमेंट बँकिंग सेवा कंपनी सुरू केली होती. त्या सेवेचं नाव X.com असं होतं. त्याला हे नाव बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता, मात्र त्यांनं तसं केलं नाही. नंतर X.com चं रूपांतर PayPal मध्ये करण्यात आलं आणि ते eBay नं विकत घेतलं. 2017 मध्ये, मस्कने पुन्हा एकदा PayPal कडून X.com डोमेन नाव विकत घेतलं. सध्या X.com सर्च केल्यास तुम्ही थेट Twitter वर पोहचाल. मस्कचं उद्दिष्ट एक असा प्लॅटफॉर्म तयार करणं आहे, जिथे लोकांना दररोजच्या वस्तू किंवा सेवा एकाच ठिकाणी मिळतील. X.com बद्दलचा त्याचा दृष्टिकोनही असाच होता. कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी देखील दुजोरा दिला आहे की, X आता केवळ संवादाचं साधन राहणार नाही, तर या ठिकाणाहून बरेच काही केलं जाऊ शकतं. मस्क आणि Xचा संबंध मस्कच्या कंपन्यांच्या नावांमध्ये एक्स आहे. एलॉन मस्कच्या सध्याच्या कंपन्यांमध्ये SpaceX, Tesla Model X या नावात ‘एक्स’ हे अक्षर असलेल्या कंपन्या आहेत. तर, त्याच्या मुलांच्या नावामध्येदेखील एक्स आहे. X AE आणि A-XII अशी त्यांची नावं आहेत. मस्कनं अलीकडेच सुरू केलेल्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स कंपनीचं नाव xAI असं आहे. ज्या कंपन्यांच्या माध्यमातून मस्कनं ट्विटर विकत घेतलं त्यांचं नावही एक्स होल्डिंग्ज असं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या