JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Elon Musk यांची हुकुमशहा Kim jong यांच्याशी तुलना का सुरुये? मस्क यांनी असं काय केलं?

Elon Musk यांची हुकुमशहा Kim jong यांच्याशी तुलना का सुरुये? मस्क यांनी असं काय केलं?

Elon Musk नव्या हेअर स्टाईलमुळे ते सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहेत. या हेअरकटमुळे त्यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनशी (Kim Jong Un) केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 डिसेंबर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon musk ) हे अनेकदा आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात. पण यावेळी त्यांच्या नव्या हेअर स्टाईलमुळे ते सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहेत. या हेअरकटमुळे त्यांची तुलना उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनशी (Kim Jong Un) केली जात आहे. गंमत म्हणजे मस्कने स्वतःच केस कापल्याचे सांगितले. यावर सोशल मीडियावर अनेक फनी मीम्स बनवले जात आहेत. मस्क यांचा फोटो शेअर करत एका चाहत्याने लिहिले, ‘छान हेअरकट एलोन मस्क’. प्रत्युत्तरात मस्क म्हणाले, ‘मीच असं काहीतरी केले आहे.’ यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस सुरु झाला आहे. ब्रिटिश ड्रामा सीरीज पीकी ब्लाइंडर्समधील अभिनेता सिलियन मर्फीचे पात्र टॉम शेल्बीशी मस्कचे हेअरकट जुळते असे अनेक फॉलोअर्सने म्हटले आहे अशी ही पहिलीच वेळ नाही.

ट्विटरवर 6.5 कोटी फॉलोअर्स जगातील सर्वात वॅल्युएबल ऑटो कंपनी Tesla आणि SpaceX चे CEO एलन मस्क Twitter वर खूप सक्रिय आहेत आणि या प्लॅटफॉर्मवर त्यांचे 6.5 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांच्या एका ट्वीटने अनेक कंपन्यांचे नशीब उजळले आहे. विशेषतः मीम क्रिप्टोकरन्सी Dogecoin आणि Shiba Inu च्या किमतीत त्यांच्या एका ट्वीटमुळे मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत.

अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Amazon’s Jeff Bezos) यांना मागे टाकत मस्क या वर्षी जानेवारीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 278 अब्ज डॉलर आहे. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी 122 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच्या संपत्तीत ज्या प्रकारे वाढ होत आहे, त्यानुसार ते जगातील पहिले ट्रिलिनियर बनू शकतात, असे मानले जाते. टेस्लाचे शेअर्स गेल्या वर्षभरात अनेक पटींनी वाढले आहेत, ज्यामुळे मस्कच्या नेट वर्थमध्ये (Elon musk Net Worth) वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या