JOIN US
मराठी बातम्या / विदेश / WHO ने चीनवर व्यक्त केली नाराजी; कोरोनासंबंधात इटलीच्या तज्ज्ञांचा दावाही फेटाळला

WHO ने चीनवर व्यक्त केली नाराजी; कोरोनासंबंधात इटलीच्या तज्ज्ञांचा दावाही फेटाळला

WHO च्या प्रमुखांनी जगभरात कोरोनासाठी दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटीकच्या अतिरिक्त वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 जून : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिजैविकांचा (अँटीबायोटीक) जास्त वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गॅबेरियस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रतिजैविकांचा जास्त वापर केल्याने धोकादायक जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढते. हे प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. काही काळानंतर प्रतिजैविकांचे जास्त सेवन धोकादायक बॅक्टेरियाला मजबूत बनवतो. गॅबेरियस नमूद करतात की, बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका जास्त असलेल्या कोरोना रूग्णांवरच उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सची आवश्यकता असते. असे रुग्ण दुर्मिळ असतात. उर्वरित कमी गंभीर रूग्णांना प्रतिजैविक थेरपी दिली जाऊ नये. गॅबेरियस असे नमूद करतात की, आमच्या काळामधील सर्वात मोठे आव्हान म्हणजे एंटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा धोका. हे स्पष्ट आहे की जगातील महत्वपूर्ण अँटीमाइक्रोबियल औषधे वापरण्याची क्षमता गमावत आहे. त्यामुळे बर्‍याच गरीब देशांमध्ये ही औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. चीनने डब्ल्यूएचओला डेटा देण्यास दिला नकार WHO चीनवरही नाराज होता, चीन हा कोरोना संशोधनाचा डेटा शेअर करत नव्हता. एपीने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की डब्ल्यूएचओबरोबर डेटा शेअर करण्यास चीन टाळाटाळ करीत होता. त्याने कोरोनाशी संबंधित जेनेटिक नकाशा, जीनोमच्या संरचनेशी संबंधित काही महत्त्वाचे तथ्य अनेक आठवड्यांपर्यंत लपवून ठेवले होते. चीनने डब्ल्यूएचओकडून अनेक संशोधनाची माहिती लपवली आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. डब्ल्यूएचओ अधिकारी आणि चीनी आरोग्य मंत्रालय यांच्यात ईमेलच्या माध्यमातून डेटा सामायिक करण्याबद्दल बर्‍याच वेळा चर्चा झाली. डब्ल्यूएचओने मेलमध्ये लिहिलं आहे की, या चीनच्या अशा वागणुकीमुळे लसीच्या सुरुवातीलच्या संशोधनात विलंब झाला. WHO ने इटलीच्या डॉक्टरांचा दावा नाकारला WHO कार्यकारी संचालक माइक रिएन यांनी कोरोना कमकुवत झालेला नाही असे सांगून इटालियन डॉक्टरांचा दावा नाकारला आहे. इटलीचे अव्वल डॉक्टर अल्बर्टो जॅंगेरिलो म्हणाले होते की, त्याच्या देशात कोरोनाचे अस्तित्व वैद्यकीयदृष्ट्या संपले आहे. यावर डब्ल्यूएचओच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅन म्हणतात की, कोरोना बदलला आहे असे सांगण्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही. हे वाचा- Nisarga Effect : चक्रीवादळामुळे चारजणं जखमी; अद्याप जीवितहानी नाही View Survey

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या