JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 'या' पाच ठिकाणचे लोक पार करतात वयाची शंभरी, असं काय आहे Blue Zones चं सिक्रेट?

'या' पाच ठिकाणचे लोक पार करतात वयाची शंभरी, असं काय आहे Blue Zones चं सिक्रेट?

जगभरात अशी काही ठिकाणं आहेत जिथं लोक 100 वर्षांहून (Centenarian) अधिक काळ जगतात! या ठिकाणांना ‘ब्लू झोन’ (Blue zones) म्हणून ओळखलं जातं. हे ब्लू झोन जगाच्या वेगवेगळ्या भागात आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जानेवारी: असं म्हणतात मृत्यू (Death) कुणाच्याही हातात नसतो. आपण नेमकं किती वर्ष जगणार याचा साधा अंदाज लावणंही अशक्य आहे. मात्र जगभरात अशी काही ठिकाणं आहेत जिथं लोक 100 वर्षांहून (Centenarian) अधिक काळ जगतात! या ठिकाणांना ‘ब्लू झोन’ (Blue zones) म्हणून ओळखलं जातं. हे ब्लू झोन जगाच्या वेगवेगळ्या भागात आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं वय इतरांपेक्षा जास्त असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. संशोधनातून याचे पुरावेही मिळाले आहेत. येथील लोक दीर्घकाळ का जगतात? याबाबत शास्त्रज्ञांनी विस्तृत संशोधन केलं आहे. या संशोधनातून अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या या लोकांच्या दीर्घ आयुष्याचं (Long Life) गुपित उघड करतात. ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट जाणून घेण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक टेलिव्हिजन नेटवर्कचे लेखक डॅन ब्यूटनर (Dan Buettner) यांनी रिसर्च केला. आपल्या रिसर्च अंतर्गत डॅन यांनी जगातील पाचही ब्‍लू झोन्‍सची पाहणी केली व तेथील जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणचं लोकजीवन खूप वेगळं आहे. पाचही झोनमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत आणि तेच त्यांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे, असं डॅनच्या निदर्शनास आलं. हे पाच ब्लू झोन कोणते आहेत आणि त्यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? हे आपण जाणून घेऊया. हे वाचा- Amazing! याठिकाणी एखादी वस्तू हरवत नाही आणि चुकून हरवलीच तरी लगेच मिळते परत ब्लू झोन जगातील पाच वेगवेगळ्या भागांत आहेत. मध्य अमेरिकेतील कोस्टा रिकामधील निकोया (Nicoya), इटलीतील सार्डिनिया (Sardinia), ग्रीसमधील आयकेरिया (Icaria), जपानमधील ओकिनावा (Okinawa) आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लोमा लिंडा (Loma Linda) या पाच ठिकाणांचा समावेश ब्लू झोनमध्ये होतो. बीबीसीच्या वृत्तानुसार, या भागांना सर्वप्रथम इटालियन महामारीशास्त्रज्ञ (Epidemiologist) जियानी पेस (Gianni Pace) आणि बेल्जियन लोकसंख्या तज्ज्ञ (Demographer ) मायकेल पॉलिन (Michael Pauline) यांनी ब्लू झोन म्हणून त्या ठिकाणांचं वेगळेपण ओळखलं होतं. त्यांनी ब्लू झोनवर एक पुस्तकही लिहिलेलं आहे. ब्लू झोनमध्ये राहणारे लोक केवळ शरीराच्याच नाही तर मनाच्या आरोग्याकडेही पूर्ण लक्ष देतात. मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी हे लोक बागकाम करतात. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, डॅन ब्यूटनर यांच्या मते, येथील लोकांमध्ये प्रचंड धार्मिक श्रद्धा आहे. उदाहरणार्थ, लोमा लिंडाचे रहिवासी सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्ट चर्चचे (Seventh-day Adventist Church) अनुयायी आहेत. कोस्टा रिकातील निकोया आणि इटलीतील सार्डिनिया येथे राहणारे कॅथलिक ख्रिश्चन (Catholic Christian) आहेत. तर, ग्रीसमधील आयकेरिया बेटावरील रहिवासी ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर (Greek Orthodox Church) विश्वास ठेवतात. येथील लोक कधीच प्रमाणापेक्षा जास्त जेवत नाहीत. त्यांच्या आहारात भाज्या, शेंगा यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश असतो. हे लोक मांसाहार फार कमी प्रमाणात घेतात. शाकाहारी (Vegetarian) जेवणावर त्यांच्या जास्त भर असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम राहते. ब्लू झोनमधील लोकांना रताळी आणि टरबूज जास्त आवडतं. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात. जसं की, पोटॅशियम ब्लड प्रेशर कमी करतं आणि फायबर पोट स्वच्छ ठेवतं. हे वाचा- धक्कादायक! मसाज पार्लरमध्ये गेलेला 70 वर्षीय वृद्ध; तरुणीने हात लावताच मृत्यू ब्लू झोनमधील लोक जिममध्ये (Gym) जाण्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम करण्यास प्राधान्य देतात. शरीरासाठी जेवणासोबत व्यायामदेखील (Exercise) तितकाच गरजेचा आहे, असा या लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे ते आहाराइतकाच व्यायामालाही महत्त्व देतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय (Physically active) राहिल्यानं ते आजारपणांपासून दूर राहतात. या लोकांना समूहानं राहण्याची सवय आहे. त्यांची ही सवय त्यांना आनंदी आणि उत्साही ठेवते. ब्लू झोनमधील लोक रात्री सरासरी सात तासांची झोप घेतात तर दिवसा 30 मिनिटांची नॅप घेतात. आपल्या शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) आरोग्याकडं लक्ष देणं ही येथील लोकांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतात. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या वयावर होतो. आरोग्यदायी सवयींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, हे अभ्यासातून सिद्ध झालेलं आहे. ब्लू झोनमधील लोकांची लाइफस्टाईल (Lifestyle) पाहता त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित सहज लक्षात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या