नवी दिल्ली, 3 मार्च : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Union Minister Jyotiraditya Shinde) हे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला गेले आहेत. येथील एका नेत्यासोबत त्यांचा वाद झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोमानियाचे महापौर शिंदेंविरोधात बोलत असल्याचं सांगितलं जात आहे. तरी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची आम्ही पुष्टी करीत नाही. हा (Operation Ganga) व्हिडीओ 43 सेकंदाचा असून रोमिनियाचे मेअर ज्योतिरादित्य शिंदेंशी बोलताना दिसत आहे. मेअर शिंदेंना म्हणतात की, हे तुम्ही सांगू नका..यावर शिंदे म्हणतात, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलू..हे तुम्ही ठरवू शकत नाही. यावर रोमानियाचे मेयर संतापतात आणि म्हणतात, तुम्ही फक्त त्यांना इतकच सांगा की, हे कधी जाऊ शकतात. आणि कसं जाणार..तुम्ही यांना भारतात कसं घेऊन जाणार आहात? आम्ही यांच्यासाठी खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. इतकं म्हणून ती व्यक्ती निघून जाते. दुसरीकडे शिंदे तेथे उभ्या असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्याची योजना सांगतात. सोबतच सरकारकडून केलेल्या व्यवस्थेची माहिती देतात. शिंदे म्हणतात की, येथील सर्व विद्यार्थ्यांना देशात सुरक्षितपणे घेऊन जाऊ. सोबतच रोमानिया सरकारचे धन्यवादही मानतात.
काँग्रेस नेता सलमान निजामीने व्हिडीओ ट्वीट करून लिहिलं आहे की, ‘जुमला’ भारतात चालू शकतं, मात्र परदेशात नाही. पाहा बचाव कार्य शिबिरात रोमानियाचे मेयन कशा प्रकारे ज्योतिरादित्य शिंदेंची शाळा घेत आहेत. रोमानियाचे मेअर त्यांना म्हणाले की, तुम्ही येथून कधी जाणारा, येथे आम्ही विद्यार्थ्यांना जागा आणि जेवण देत आहे..तुम्ही नाही. काँग्रेस प्रवक्त्यांनी दावा केला आहे की, यादरम्यान विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.