या दरम्यान सीबीआयने तत्काल सीमा शुल्क आणि क्षेत्र संरचनांना तातडीने पुष्टी करण्यास सांगण्यात आले आहे. येत्या 48 तासांत देशातील विविध भागांमध्ये असणाऱ्या धोकादायक घटकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बैरुत, 4 ऑगस्ट : लेबननची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. देशाच्या स्वास्थ मंत्र्यांनुसार लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भयंकर स्फोट झाल्याने शेकडो लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या या जबरदस्त स्फोटामुळे अनेक भागात धक्का बसला आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट राजधानीच्या बंदराच्या भागात झाला, येथे अनेक गोदाम आहेत.
सेंट्रल बैरूतमध्ये संध्याकाळी दोन मोठे स्फोट झाले. लेबननमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावं, असं आवाहनही करण्यात आहे.
स्फोटकांच्या कारखान्यात किंवा साठ्याजवळ हा स्फोट झाला असावा. दारूगोळा कारखान्यात हा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे शहराचा मोठा भाग हादरला. रस्त्याला भेगा पडल्या आणि आसपासच्या इमारतींनाही धक्का बसला. बातमी अपडेट होत आहे.