JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / विमानाच्या पायऱ्या चढता-चढता पाय घसरला अन्...; अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे फोटो Viral

विमानाच्या पायऱ्या चढता-चढता पाय घसरला अन्...; अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे फोटो Viral

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे असे व्हिडिओ अनेक वेळा समोर आले आहेत, यामध्ये ते बोलता-बोलता झोपी गेले आहेत किंवा लोकांची नावं विसरले आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन 79 वर्षांचे आहेत. ते अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. (सर्व फोटो - ट्विटर)

0107

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना अडखळताना दिसत आहेत. मात्र, त्यांनी काही सेकंदातच स्वत:ला सावरलं आणि सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

जाहिरात
0207

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका टीव्ही शोमध्ये मुलाखत देण्यासाठी लॉस एंजेलिसला जात होते. लॉस एंजेलिसला जाण्यासाठी ते एअरफोर्स वनच्या पायऱ्या चढत होते. त्यानंतर त्याचं संतुलन बिघडलं आणि ते पायऱ्यांवर अडखळले. व्हिडिओमध्ये तो हाताच्या मदतीने उठताना दिसत होता.

जाहिरात
0307

यापूर्वी 2021 मध्ये जो बायडेनसोबतही अशीच घटना घडली होती. ते अटलांटा येथे जात होते, जिथे ते आशियाई-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांना भेटणार होते. त्यादरम्यान ते तीन वेळा अडखळले.

जाहिरात
0407

बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. 79 वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने 20 जानेवारी 2021 रोजी पदाची शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली. मात्र, आता तब्येतीची कारणं, अधेमधे डुलक्या काढणं, विसराळूपणामुळे ते चर्चेत येत आहेत. याआधी माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचित्र वक्तव्ये, ट्विट्स किंवा आणखी अनेक कारणांनी वारंवार चर्चेत राहिले. तसेच, ट्रोलही झाले. त्यांच्या काही ट्विट्सनंतर त्यांच्यावर अमेरिकन अध्यक्षपदाला न शोभणारं वर्तन केल्याचा आरोपही झाला.

जाहिरात
0507

बायडेन यांचे असे व्हिडिओ अनेक वेळा समोर आले आहेत, ज्यामध्ये ते बोलता-बोलता झोपी गेले आहेत. तसेच, लोकांची नावं विसरत आहेत. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलत असताना बायडेन यांना जवळजवळ झोप लागली होती.

जाहिरात
0607

त्यांच्या विस्मरण होण्यामुळे, त्याची ट्रेन अनेक वेळा चुकली आहे. तसंच, डझनभर वेळा बोलताना त्यांनी लोकांची नावं चुकीची घेतली आहेत.

जाहिरात
0707

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन या वर्षी नोव्हेंबरमध्ये 80 वर्षांचे होणार आहेत. 2021 मध्ये त्यांनी पदाची शपथ घेतली. जेव्हा त्यांच्या पदाचा कालावधी पूर्ण होईल, तेव्हा ते 83 वर्षांचे असतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या