University of Kent च्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख जेरेम रॉसमॅन यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलंय.
न्यूयॉर्क 29 मे: जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. त्यात प्रगतीही होत आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असतानाच अमेरिकेची मोठी औषध निर्माण कंपनी असलेल्या फायझरने पुढच्या पाच महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत यावर लस तयार होईल असा दावा केला आहे. Pfizer चे CEO अल्बर्ट बॉरला (Albert Bourla) यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, कंपनी गेली काही महिने यावर संशोधन करत असून ते अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यात निर्णायक प्रगती होईल असा दाही त्यांनी केला. फायझर जर्मनीची कंपनी बायोटेक (Biotech)च्या मदतीने अमेरिका आणि युरोपसाठी औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या आधीही अनेक कंपन्यांनी औषधाच्या मानवी चाचण्या सुरू असल्याचा दावा केला होता. दरम्यान, कोरोनाव्हायरस (Coronavirus) जेव्हा जगभरात मोठ्या वेगानं पसरत होता तेव्हा त्याच्या टेस्ट किटबाबत अनेक चर्चा होत्या. जगभरात कोरोना पसरवलेल्या चीननं स्वतःच कोरोना टेस्ट किट तयार करून इतर देशांना महागड्या दरानं विकल्या. यातील बर्याच किट सदोष असल्याचे आढळले आणि त्यांचे परिणाम अचूक असल्याचे आढळले नाही. आमच्यात कुण्या तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही; चीनने अमेरिकेला धुडकावलं भारतासह अनेक देशांनी या वाईट टेस्ट किट चीनला परत केल्या. कधी अँटीबॉडी टेस्ट किट, तर कधी आरटी-पीसीआर टेस्ट किटबद्दल प्रश्न उपस्थित होत. आता इस्त्राईलनं केवळ 3,800 रुपयांची कोरोना टेस्ट किट बनवण्याचा दावा केला आहे, ज्यामुध्ये केवळ 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. फूंक मारून होणार व्हायरसचं निदान इस्राईलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या (Ben-Gurion University) संशोधकांनी बनवलेल्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल कोरोना टेस्ट किट नाक, घसा आणि फूंक मारून नमुने घेत आहेत. हे किट एम्म्प्टोमॅटिक कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये संक्रमणाची अचूक चाचणी देखील करू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार किटमध्ये असलेले एक खास प्रकारचा सेन्सर कोरोनाचे निदान करते. कोरोनाच्या संकटकाळात हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा जेव्हा रुग्ण चाचणी किटमध्ये फूंकतो तेव्हा ते कण सेन्सरपर्यंत पोहोचतात. हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. सेन्सर सिस्टमचे विश्लेषण केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळतं.