JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तीन मजली इमारतीला भीषण आग, स्मोक डिटेक्टर बंद; 50 मिनिटांत 7 मुलांसह 13 जणांचा जळून मृत्यू

तीन मजली इमारतीला भीषण आग, स्मोक डिटेक्टर बंद; 50 मिनिटांत 7 मुलांसह 13 जणांचा जळून मृत्यू

तीन मजली घराला आग लागल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 7 लहान मुलांचा देखील समावेश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 06 जानेवारी: अमेरिकेच्या पूर्वेकडील (Eastern U.S) फिलाडेल्फिया (Philadelphia) शहरात स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघात घडला. या अपघातात 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. फिलाडेल्फियाच्या डाउनटाउनमधील N23rd स्ट्रीटच्या 800 ब्लॉकवरील तीन मजली घराला आग लागल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला. फिलाडेल्फिया अग्निशमन विभागाचे उपायुक्त क्रेग मर्फी यांनी सांगितले की, आग विझली असतानाही इमारतीच्या आतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. मृतांव्यतिरिक्त अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागलेली ही इमारत फिलाडेल्फिया सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाची आहे. स्मोक डिटेक्टर खराब होते, अवघ्या 50 मिनिटांत सर्वांचा मृत्यू इमारतीला आग लागल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण तेथे बसवण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरमध्ये बिघाड झाल्याचे मानले जात आहे, त्यामुळे इमारतीत उपस्थित लोकांना वेळेत आगीची सूचना मिळू शकली नाही. इमारतीत चार स्मोक डिटेक्टर असून चारही खराब झाल्याचं आढळून आल्याचे उपायुक्त मर्फी यांनी सांगितले. 8 लोकांचा वाचला जीव आगीची माहिती मिळताच स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.40 वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि 50 मिनिटांत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत 7 मुलांसह 13 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. बहुतेक मृत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. दरम्यान या आगीतून आठ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या