JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अभी तो पार्टी शुरू हुई है… ब्रिटीश पंतप्रधानांचा ग्लास घेऊन डान्स, VIDEO झाला Viral

अभी तो पार्टी शुरू हुई है… ब्रिटीश पंतप्रधानांचा ग्लास घेऊन डान्स, VIDEO झाला Viral

हातात ग्लास, बॅकग्राऊंडला जोरदार संगीत आणि थिरकणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 18 जानेवारी: युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) हातात ग्लास (Glass) घेऊन एका पार्टीत डान्स (Dance in the party) करत असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेल्या पार्ट्यांमुळे वादात सापडलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन या व्हिडिओमुळे अधिकच चर्चेत आले आहेत. एका महिलेसोबत हातात ग्लास घेऊन जॉन्सन हे नृत्याचा आनंद लुटत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.   जॉन्सन आणि वाद युकेमध्ये पहिला आणि दुसरा लॉकडाऊन असतानाही मद्याच्या पार्ट्या आयोजित केल्याच्या प्रकरणावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या अडचणीत सापडले आहेत. ब्रिटीश राजपुत्राच्या निधनाचा दुखवटा असतानाही पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी दोन पार्ट्या आयोजित केल्याचं सिद्ध झाल्यानंतर या विषयावरून जोरदार वाद निर्माण झाला असून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच आता हा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

संबंधित बातम्या

काय आहे व्हिडिओत? व्हिडिओत ज्या महिलेसोबत पंतप्रधान बोरिस जॉन्सन नृत्य करत आहेत, त्या लंडन असेंब्लीच्या तत्कालीन अध्यक्ष असल्याची चर्चा आहे. मात्र त्याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. जॉन्सन हे मात्र नृत्याचा आनंद घेत असताना स्पष्टपणे या व्हिडिओत दिसत आहेत. एरवी मद्याच्या पार्ट्या आयोजित करणे आणि पार्ट्यांमध्ये नृत्य करणे हा ब्रिटीशांसाठी काही नवा प्रकार नाही. मात्र कोरोनाच्या काळात नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असताना अशा पार्ट्या केल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन वादात अडकले आहेत.   हे वाचा -

व्हिडिओ नवा की जुना? हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दारू पार्टी आणि बोरिस जॉन्सन यांच्या संबंधातून सध्या वाद निर्माण झाल्यामुळे हा व्हिडिओ जोरदार शेअर होत असल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या