JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाच्या काळात या मुस्लीम देशाने खरेदी केल्या 4 हजार गाई, वाचा काय आहे कारण

कोरोनाच्या काळात या मुस्लीम देशाने खरेदी केल्या 4 हजार गाई, वाचा काय आहे कारण

कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे जागतिक अन्नपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे खाद्य सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब इमिरेट्स (UAE) या देशाने एका अभियानअंतर्गत उरुग्वेमधून 4,500 डेअरी गाई मागवल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अबू धाबी, 06 जुलै : कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे जागतिक अन्नपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे खाद्य सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब इमिरेट्स (UAE) या देशाने एका अभियानअंतर्गत उरुग्वेमधून 4,500 डेअरी गाई मागवल्या आहेत. स्थानिक मीडिया अहवालानुसार 4,500 Holstein  गाईंचा पहिला कळप खलिफा बंदरात पोहोचला आहे. Holstein   ही गाय दूध उत्पादनासाठीच्या उत्तम जातींपैकी एक आहे. खाद्य सुरक्षा राज्य मंत्री मरियम अल्महेरी यांनी अशी माहिती दिली की, स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणखी मजबूत करण्यासाठी हे एक उत्तम पाऊल आहे. गल्फ न्यूज डॉट कॉमच्या एका अहवालानुसार Holstein गाईंना 40 दिवसांच्या रेकॉर्ड कालावधीमध्ये खलिफा बंदरामध्ये आयात करण्यात आले आहे. युएई आणि इतर बहुतेक आखाती देश मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची आयात करतात कारण तेथील कोरड्या वातावरणामुळे पिके आणि पशुसंवर्धन करणे अवघड आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय, ग्राहक व औद्योगिक उत्पादनांच्या परदेशी पुरवठ्यावरही अवलंबून आहेत. (हे वाचा- केवळ 4,852 रुपयात करा सोनेखरेदी! मोदी सरकारच्या या योजनेत मिळेल अतिरिक्त सूट ) जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून युएई सरकारने अन्नधान्याचा पुरवठा अखंडितपणे चालू राहावा याकरता अनेक उपाययोजना केल्या आहेत. एक अन्न-सुरक्षा परिषद आवश्यक वस्तूंच्या साठवणीसह अधिकृत प्रयत्नांमध्ये समन्वय साधते. परदेशातून होणाऱ्या तांदुळाच्या खरेदीवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी युएई तांदळाची लागवड देखील करत आहे. (हे वाचा- कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी होते शरीराची अवस्था ) सध्याच्या जागतिक परिस्थितीत, विविध अन्नधान्य क्षेत्रात देशांतर्गत अन्न सुरक्षा मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीतही निरंतर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी UAE सरकारने त्यांची योग्यता व कार्यक्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या