इस्तंबुल, 04 ऑक्टोबर : तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी एका 3 वर्षांच्या मुलीला 65 तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात जिवंत य़श आलं आहे. ही घटना ताजी असतानाच तुर्कस्थानातील इजमिर शहरात 4 वर्षांच्या मुलीला 91 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. असं म्हणातात देव तारी त्याला कोण मारी. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी तुर्कस्थान हारदलं होतं. 7 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला असून, संपूर्ण इमारतच्या इमारत कोसळली होती. या घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आली आहे. तब्बल 91 तासांनंतर ही चिमुकली सुखरुपपणे बचावली आहे. या चिमुकलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे वाचा- भारीच!60 सेकंदात इतके पुलअप्स मारून रचला वर्ल्ड रेकॉर्ड,वाचून विश्वास बसणार नाही अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार बचावकार्यादरम्यान त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज आला. भूकंपाला 4 दिवस उलटूनही ही चिमुकली ढिगाऱ्याखाली जिवंत होती. अधिकाऱ्यांनी आवाजाच्या दिशेनं शोध घेतला आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 4 वर्षांची चिमुकली ढिगाऱ्याखाली होती. तिचे श्वास सुरू होते. त्यांनी तातडीनं रेस्क्यू करून या चिमुकलीला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. तुर्कस्तान आणि ग्रीसमध्ये (Turkey And Greece) आलेल्या जबरदस्त भूकंपानंतर आता बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे झालेल्या विनाशामध्ये आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900हून अधिक जखमी झाले आहेत.