A girl wearing a protective face mask as a preventive measure against the spread of the new coronavirus ride a bicycle with her father in Havana, Cuba, Saturday, March 21, 2020. (AP Photo/Ramon Espinosa)
अश्गाबत 1 एप्रिल : कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलंय. सोशल मीडिया असो की टी.व्ही. सगळीकडे फक्त चर्चा आहे ती कोरोनाव्हायरसची. सगळं जग आज तोंडावर मास्क लावून फिरतं आहे. 180 पेक्षा जास्त देशांमध्ये याने विळखा घातलाय. मात्र एका देशाने मात्र चक्क कोरोनाव्हायरस हा शब्दच उच्चारण्यावर बंदी घातली आहे. एवढच नाही तर मास्क लावण्यावरही बंदी घातलीय. असं करताना कोणी आढळलं तर त्याला सरळ तुरूंगात टाकण्याचा आदेशच देण्यात आला आहे. हा देश आहे तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही असा तिथल्या सरकारचा दावा आहे. जगभर काहीही असलं तरी त्याचा देशातल्या लोकांनी परिणाम होऊ देऊ नये. असं सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर कुणी मास्कही लावायचा नाही अशी तंबीही दिलीय. मास्क लावण्यामुळे भीती वाढते असं त्यांना वाटत आहे. कोरोनव्हायरस विषयी कुणी चर्चा करत असेल तर पोलीस त्यांना अटक करू शकतात. जगभर लोकांना मास्क पाहिजे आहेत. त्याचा तुटवडा सर्वत्र जाणवतोय. आणि हा देश मास्क लावण्यावर बंदी घालतोय. तुर्कमेनिस्तानच्या या निर्णयाची जगभर चर्चा रंगली आहे. हे वाचा - चर्चमधल्या कार्यक्रमाने फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब? ‘या’ देशात 3500 जणांचा मृत्यू दरम्यान, अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अमेरिकेत वाढत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर सध्या कोरोनाचे नवीन केंद्र बनले आहे. दर 2.9 मिनिटाला न्यूयॉर्कमध्ये एकाचा मृत्यू होत आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे की, रुग्णालयाजवळ मृतदेह ठेवण्यासाठी एक ट्रक उभा करण्यात आला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये 90 मिनिटांत कोरान विषाणूमुळे 138 लोकांचा मृत्यू झाला. हे वाचा - मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह अमेरिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या जवळ पोहचला आहे. यातील 70 हजाल रुग्ण हे एकट्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. ब्रूकलिनच्या माउंट सिनाई रुग्णालयाबाहेरचे दृश्य वेदनादायक आहे. तेथील रुग्णालयाच्या बाहेर रेफ्रिजरेटेड ट्रक बसविण्यात आला आहे. दर तासाने या ट्रकमध्ये मृतदेह गोळा केले जात आहेत. न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासिओ यांनी, आरोग्य कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. अधिक मृतदेह साठवण्याबाबत फेडरल इमरजेंसी मॅनेजमेंट एजन्सीमार्फत काम केले जात आहे. रुग्णवाहिका सेवा देखील वाढविण्यात आली आहे, असे सांगितले.