JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ऐका आता...इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा केला 'शहीद' असा उल्लेख

ऐका आता...इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा केला 'शहीद' असा उल्लेख

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत अमेरिकेवरही निशाणा साधला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 25 जून : दहशतवाद निर्मूलनाबाबत पाकिस्तानचा दृष्टिकोन काय आहे, हे पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. जगभरात भयावह दहशतवादी हल्ले करणार्‍या अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘शहीद’ म्हणून संबोधले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरूद्ध कोणतेही पाऊल उचलले नाही आणि दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा त्याच्यावर आधीच आरोप आहे, असे वक्तव्य खान यांनी केले आहे. हे वाचा- सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रियंका गांधी अडचणीत; बाल संरक्षण आयोगाची नोटीस इस्लामाबादला न सांगता ओसामाला केलं शहीद इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अल कायद्याचा नेता आणि भयानक दहशतवादी ओसामा बिन लादेन याला संसदेत ‘शहीद’ म्हटले आहे. इतकेच नव्हे तर दहशतवादाविरूद्धच्या युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला पाठिंबा देऊ नये, असेही खान म्हणाले. अमेरिकेवर हल्ला चढवत खान म्हणाले की, अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला ‘शहीद’ केले आणि पाकिस्तानलाही सांगितले नाही. त्यानंतर संपूर्ण जगाने पाकिस्तानचा अपमान करण्यास सुरुवात केली. ‘पाकिस्तानी लोकांना त्रास सहन करावा लागला’ खान म्हणाले की, अमेरिकेच्या दहशतवादाविरूद्ध युद्धात पाकिस्तानने आपले 70 हजार लोक गमावले. या घटनेमुळे जे लोक पाकिस्तानच्या बाहेर होते त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे खान म्हणाले. 2010 नंतर पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले झाले आणि तेथील सरकारने केवळ त्याचा निषेध केला. ते म्हणाले की, अमेरिकेच्या अ‍ॅडमिरल मालन यांना पाकिस्तानवर ड्रोन हल्ले का केले जात आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, सरकारच्या परवानगीने ही कारवाई केली जात आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या