JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मालकीणीवरील अत्याचाराचा पोपट ठरला मुख्य साक्षीदार; आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून कोर्टात दिली साक्ष

मालकीणीवरील अत्याचाराचा पोपट ठरला मुख्य साक्षीदार; आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून कोर्टात दिली साक्ष

एका पोपटामुळे त्याच्या मालकीणीला न्याय मिळणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्यूनस आयर्स, 17 सप्टेंबर : अर्जेंटिनामध्ये (Argentina) बलात्कार आणि हत्या प्रकरणात (Rape & Murder) एक पोपट मुख्य साक्षीदार (Parrot) ठरला आहे. कोर्टात पोपटाची साक्षदेखील घेण्यात आली आणि त्याच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय एलिजाबेथ टोलेडो (Elizabeth Toledo) हिच्यावर बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आली होती. ज्या वेळी ही घटना घडली, महिलेचा पोपट तिथेच होता. त्याने महिलेवर घडलेला प्रकार पाहिला होता. त्यामुळे वकिलांनी पोपटालाच मुख्य साक्षीदार (parrot became the main witness) म्हणून कोर्टासमोर हजर केलं. घरात सापडला होता महिलेचा मृतदेह ‘द सन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एलिजाबेथ टोलेडो ही आणखी दोघांसह भाड्याच्या घरात राहते. पोलिसांना महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात मिळाला. तिच्यासोबत राहणाऱ्या दोघांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र चौकशीदरम्यान फार काही हाती लागू शकलं नाही. मात्र पोपटाच्या साक्षीनंतर प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. (The parrot became the main witness to the abuse of ownership Testimony given in court to convict the accused) हे ही वाचा- भयंकर! एअरपोर्टच्या बाथरूममध्येच प्रसुती; तोंडात टॉयलेट पेपर कोंबुन बाळाची हत्या पोपट ठरला साक्षीदार.. प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, घटनास्थळावर तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने तेथे असलेला पोपट काहीतरी म्हणत असल्याचं पाहिलं. पोपटाच्या साक्षीमुळे केस सोडवायला मदत होऊ शकते, असे पोलीस अधिकाऱ्याला वाटलं. अर्जेंटिनाच्या सॅन इसिड्रो कोर्टात पोलिसांनी पोपट काहीतरी म्हणत असल्याचं सांगितलं. ‘नको प्लीज नको..मला जाऊ द्या. तुम्ही मला का मारताय?’ असं पोपट म्हणत होता. शेजारच्यांनीदेखील महिलेच्या तोंडून असे शब्द ऐकल्याचं समोर आलं. आजीवन कारावासाची शक्यता एलिजाबेथ टोलेडो मृत्यूपूर्वी आरोपींना असंच काहीसं म्हणाली असेल. जे पोपटाने ऐकलं व लक्षात ठेवलं. पोलिसांनी 53 वर्षीय मिगुएल रोलन आणि 65 वर्षीय जॉर्ज अल्वारेज़ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जर हे दोघे दोषी असल्याचं समोर आलं तर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. पोपटाच्या साक्षीव्यतिरिक्त पोलिसांनी मृत महिलेच्या डीएनए रिपोर्टवरुन काही महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. टोलेडो हिच्यावर 2018 डिसेंबरमध्ये बलात्कार आणि त्यानंतर हत्या करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या