JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Taliban राजवटीला 6 महिने पूर्ण, या परिस्थितीत जगत आहेत Afghani नागरिक

Taliban राजवटीला 6 महिने पूर्ण, या परिस्थितीत जगत आहेत Afghani नागरिक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवटीला सहा महिने पूर्ण होत आहेत. सहा महिने पूर्ण होताना अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 16 फेब्रुवारी: अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवटीला सहा महिने पूर्ण होत आहेत. सहा महिने पूर्ण होताना अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अफगाणिस्तानातील लोकांना आता सुरक्षित वाटत आहे आणि अनेक दशकांनंतर हिंसाचार कमी झाला आहे. पण एकेकाळी परकीय मदतीवर चालणारी अफगाण अर्थव्यवस्था आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. अफगाणिस्तानातून हजारो लोक पळून गेले आहेत किंवा बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये सुशिक्षित उच्चभ्रू वर्गातील लोकांची संख्या अधिक आहे. या लोकांना त्यांच्या आर्थिक भविष्याबद्दल किंवा स्वातंत्र्याच्या अभावाबद्दल भीती वाटते. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात पूर्वीच्या तालिबान राजवटीत मुलींना शाळेत जाण्यास आणि महिलांना कामावर बंदी घालण्यात आली होती. मंगळवारी अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला सहा महिने पूर्ण झाले. अमेरिकेचे समर्थन असलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अचानक आणि गुप्तपणे काबूल सोडून गेले होते. तालिबानने प्रांतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभर चाललेल्या लष्करी मोहिमेनंतर काबूलवरही ताबा मिळवला. मात्र, आजही सशस्त्र तालिबानी सैनिक रस्त्यावर फिरताना पाहून लोक घाबरतात. मात्र महिला पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांना काम करण्याची परवानगी 1990 च्या दशकाप्रमाणे तालिबान काही महिलांना काम करू देत आहे. आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय तसेच काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिला पुन्हा कामावर आल्या आहेत. पण इतर मंत्रालयातील महिला अजूनही कामावर परतण्याची वाट पाहत आहेत. आर्थिक मंदीच्या काळात हजारो नोकऱ्या गेल्या आणि त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसला. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या मुली शाळेत जात आहेत. मात्र बहुतांश भागात यावरच्या वर्गातील विद्यार्थिनी अजूनही घरात आहेत. तालिबानने वचन दिले की मार्चच्या अखेरीस अफगाण नवीन वर्षानंतर सर्व विद्यार्थिनी शाळेत जातील. विद्यापीठे हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. खासगी विद्यापीठे आणि शाळा कधीही बंद झाल्या नाहीत. वाढती गरिबी देशात गरिबीची समस्या गंभीर होत आहे. लोकांना स्वतःचे पैसे मिळणं कठीण झालं आहे. बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत, लोकांना पैसे काढण्यासाठी तासन् तास तर कधी दिवस वाट पाहावी लागत आहे. एका आठवड्यात बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 200 डॉलर आहे. तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानची 9 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीची विदेशी संपत्ती जप्त करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या