JOIN US
मराठी बातम्या / विदेश / महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, TV वरील महिला प्रेजेंटर्संसाठी नवीन नियम

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, TV वरील महिला प्रेजेंटर्संसाठी नवीन नियम

तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. ANI या वृत्तसंस्थेनुसार, टोलो न्यूजनं (Tolo News) ट्विट करून ही माहिती दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला प्रेजेंटर्संनी (Female Presenters) कार्यक्रम सादर करताना त्यांचे चेहरे झाकले पाहिजेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, टोलो न्यूजनं (Tolo News) ट्विट करून ही माहिती दिली आहे. गैरवर्तन आणि सदाचार, माहिती आणि संस्कृती मंत्रालयांनी हा अंतिम निर्णय असल्याचे म्हटलं आहे. तसंच अफगाणिस्तानातील सर्व माध्यमांना आदेश जारी करण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या तालिबान महिलांच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवणारे आदेश जारी करत आहेत. यापूर्वी, तालिबाननं संयुक्त राष्ट्र सहाय्यता अभियान (UNAMA) च्या महिला कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्यास सांगितलं होतं. UNAMA च्या म्हणण्यानुसार, तालिबान अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यूएनला सांगितलं की, महिला कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर काम करताना हिजाब घालण्याचा विचार करावा. UNAMA नं असंही म्हटलं आहे की, हिजाब वापरला गेला आहे की नाही यावर देखरेख करण्यासाठी मंत्रालयाचे कर्मचारी यूएन कार्यालयाबाहेर उभे राहतील. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हिजाब नसलेली महिला कर्मचारी आढळल्यास, ते हिजाब घालण्याशी विनम्रपणे बोलतील कारण बाहेर हिजाब घालणं अनिवार्य आहे. तालिबानकडून महिलांवर अनेक निर्बंध गेल्या वर्षी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने दावा केला होता की, यावेळची त्यांची सत्ता गेल्या टर्मपेक्षा (1996 ते 2001) सौम्य असेल. पण तालिबान आपलं वचन पाळताना दिसत नाही, उलट त्याने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. महिलांना अनेक सरकारी नोकऱ्या, माध्यमिक शिक्षण आणि त्यांच्या शहरात किंवा अफगाणिस्तानच्या बाहेर एकट्याने प्रवास करण्यास बंदी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या