JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 'आपसात युद्ध करा पण...', भारत-पाकिस्तानच्या वादावर तालिबानचं मोठं विधान

'आपसात युद्ध करा पण...', भारत-पाकिस्तानच्या वादावर तालिबानचं मोठं विधान

Afghanistan Crisis: तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टॅनिकझाई (Sher Mohammad Stanikzai) यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधाबाबत (India-Pakistan Relation) मोठं विधान केलं आहे.

जाहिरात

तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टॅनिकझाई यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधाबाबत मोठं विधान केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 30 ऑगस्ट: तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टॅनिकझाई (Sher Mohammad Stanikzai) यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधाबाबत (India-Pakistan Relation) मोठं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत बाबीसाठी अफगाणिस्तानचा वापर करायला नाही पाहिजे. दोन्ही देशात मोठी सीमारेषा आहे. त्याठिकाणी दोनी देश आपसात लढू शकतात. यामध्ये आम्हाला खेचण्याची गरज नाही, अशा आशयाचं वक्तव्य स्टॅनिकझाई  यांनी केलं आहे. त्यांनी CNN-News18 शी खास संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भारत आणि पाकसोबतच अफगाणिस्तान संबंधाबाबतही आपली मतं दिली आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं की, अफगाणिस्तानच्या शेजारील सर्व राष्ट्रांसोबत आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम करायचे आहेत. तालिबान पाकिस्तानच्या मदतीनं भारताला लक्ष्य करू शकतं का? याबाबत विचारलं असता, स्टॅनिकझाई यांनी म्हटलं की, “प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होणाऱ्या काही बातम्या खोट्या असतात.” आमच्याकडून असं विधान कधीही केलं गेलं नाही आणि तसे संकेतही कोणी दिले नाहीत. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत. हेही वाचा- Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 चिमुकल्यांचा बळी तालिबानच्या नेत्यानं पुढं सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या भौगोलिक आणि राजकीय संघर्षाची जाणीव आम्हाला आहे. पण तालिबानला आशा आहे की, दोन्ही देश आपल्या अंतर्गत प्रश्नांसाठी अफगाणिस्तानचा वापर करणार नाहीत. स्टॅनिकझाई पुढे म्हणाले की, दोन्ही देशात एक लांब सीमा रेषा आहे. दोन्ही देश आपापल्या सीमेवर लढू शकतात. पण यासाठी त्यांनी अफगाणिस्तानचा वापर करू नये. तसेच आम्ही कोणत्याही देशाला आमची जमीन वापरू देणार नाही. हेही वाचा- दहशतवाद्यानं बंदुकीनं उडवलं गायकाचं डोकं; तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर यापूर्वी तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी म्हटलं होतं की, अफगाणिस्तानात भारताकडून राबवण्यात आलेल्या विकास प्रकल्पाबाबत तालिबानला कधीच कोणतीही तक्रार नव्हती. पण तालिबाननं भारताचा विरोध केला, कारण नवी दिल्लीतील सरकार काबूलच्या अश्रफ घनी सरकारला पाठिंबा देत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या