तैपेई, 6 ऑक्टोबर : चीनकडून होणारं अतिक्रमण आणि घुसखोरी (Small country warns China to control aggression) यांच्याविरोधात आता छोटे देशदेखील आवाज उठवू लागले आहे. चीनकडून होणारी अतिक्रमणं थांबली नाहीत, तर जशास-तसं उत्तर (Taiwan warns China to fight back if aggression not controlled) दिलं जाईल, असा इशारा तैवाननं दिला आहे. युद्ध करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नसल्याचा इशारा तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला आहे. काय म्हणाले जोसेफ वू ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत वू यांनी चीनला कडक इशारा दिला आहे. चीनकडून अनेक प्रकारे तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी सीमेवरून घुसखोरी करून तर कधी हवाई मार्गे हद्दीची मर्यादा ओलांडून चीन दादागिरी करू पाहत आहे. चीनने जर आपल्या आक्रमकपणाला आवर घातला नाही, तर सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं वू यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? गेल्या आठवड्यात चीनकडून राष्ट्रीय दिवसांच्या प्रात्यक्षिकांचं निमित्त करून आपली विमान तैवानच्या सुरक्षा हद्दीत घुसवण्यात आली. तैवानच्या सुरक्षा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चीननं अठरा जे-16 विमानं, चार सुखोई विमानं आणि दोन अण्वस्त्रं टाकण्याची क्षमता असलेली एच-6 बॉम्बर विमानं तैवानच्या हद्दीत घुसवली. या ताफ्यात एक अँटी सबमरीन एअक्राफ्टदेखील होती. चीनच्या या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्णय तैवानने घेतला. हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प आता ‘तेवढे’ श्रीमंत राहिले नाहीत, FORBES च्या यादीतून बाहेर घुसखोरी आणि प्रत्युत्तर तैवानने तातडीने आपली फायटर प्लेन्स उडवली आणि चीनला उत्तर दिलं. आपल्या हवाई हद्दीतील घुसखोरी सहन केली जाणार नसल्याचा इशाराच तैवानने या कृतीतून चीनला दिला. मात्र त्यानंतरही चीनची खोड मोडली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा चीनकडून फायटर्स प्लेनचा ताफा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून आला. शनिवारी पहाटेच्या सुमाराला तैवानच्या हद्दीत 13 फायटर जेट घुसवण्यात आले. यामध्ये दहा जे-16, दोन एच-6 बॉम्बर आणि एक अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट यांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा तैवाननं आपली विमानं उडवून चिनी विमानांना हद्दीबाहेर हुसकावून लावलं. त्याचप्रमाणं चिनी विमानांनी पुन्हा घुसखोरी केली, तर निशाणा साधण्यासाठी आपली मिसाईलदेखील सज्ज केली. या प्रकारानंतर आता दोन्ही देशांतील तणाव वाढला असून एकमेकांविरोधात इशारे दिले जात आहेत.