JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जशास तसे: चीनच्या विमानांची तैवानमध्ये घुसखोरी, छोट्याशा देशानं दिलं सडेतोड उत्तर

जशास तसे: चीनच्या विमानांची तैवानमध्ये घुसखोरी, छोट्याशा देशानं दिलं सडेतोड उत्तर

चीनच्या फायटर प्लेनने सलग दोन वेळा घुसखोरी (Taiwan responds after China’s fighter planes enters into it’s defense zone) केल्यानंतर तैवानकडून याला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तैपैई, 2 ऑक्टोबर : चीनच्या फायटर प्लेनने सलग दोन वेळा घुसखोरी (Taiwan responds after China’s fighter planes enters into it’s defense zone) केल्यानंतर तैवानकडून याला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. चीनच्या फायटर प्लेननं तैवानच्या सुरक्षा हद्दीत प्रवेश केला. चीनने आपल्या राष्ट्रीय दिवसाचं निमित्त साधत केलेल्या प्रदर्शनावेळी (China’s planes into Taiwan zone) तैवानच्या सुरक्षा हद्दीत आपली विमानं घुसवली. मात्र तैवानकडून ही घुसखोरी सहन करण्यात आली नाही. त्यांनी चीनला सडेतोड उत्तर देत कुठल्याही परिणामांना सामोरं जाण्याची तयारी असल्याचे संकेत दिले. अशी केली घुसखोरी चीनकडून राष्ट्रीय दिवसांच्या प्रात्यक्षिकांचं निमित्त करून आपली विमान तैवानच्या सुरक्षा हद्दीत घुसवण्यात आली. तैवानच्या सुरक्षा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चीननं अठरा जे-16 विमानं, चार सुखोई विमानं आणि दोन अण्वस्त्रं टाकण्याची क्षमता असलेली एच-6 बॉम्बर विमानं तैवानच्या हद्दीत घुसवली. या ताफ्यात एक अँटी सबमरीन एअक्राफ्टदेखील होती. चीनच्या या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्णय तैवानने घेतला. घुसखोरी आणि प्रत्युत्तर तैवानने तातडीने आपली फायटर प्लेन्स उडवली आणि चीनला उत्तर दिलं. आपल्या हवाई हद्दीतील घुसखोरी सहन केली जाणार नसल्याचा इशाराच तैवानने या कृतीतून चीनला दिला. मात्र त्यानंतरही चीनची खोड मोडली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा चीनकडून फायटर्स प्लेनचा ताफा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून आला. शनिवारी पहाटेच्या सुमाराला तैवानच्या हद्दीत 13 फायटर जेट घुसवण्यात आले. यामध्ये दहा जे-16, दोन एच-6 बॉम्बर आणि एक अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट यांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा तैवाननं आपली विमानं उडवून चिनी विमानांना हद्दीबाहेर हुसकावून लावलं. त्याचप्रमाणं चिनी विमानांनी पुन्हा घुसखोरी केली, तर निशाणा साधण्यासाठी आपली मिसाईलदेखील सज्ज केली. हे वाचा - पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं हास्यास्पद स्पष्टीकरण चीनकडून सतत घुसखोरी आपल्या क्षमतांची चाचणी घेण्यासाठीच ही उड्डाणं करण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. यापूर्वी जून महिन्यातही एकदम 28 विमानांचा ताफा पाठवत चीनकडून घुसखोरी करण्यात आली होती. तैवानवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन सातत्यानं दबाव टाकत असल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या