JOIN US
मराठी बातम्या / विदेश / महिलेला मिळाला 22 कोटी जिंकल्याचा Spam Email आणि निघाला चक्क ‘खरा’

महिलेला मिळाला 22 कोटी जिंकल्याचा Spam Email आणि निघाला चक्क ‘खरा’

स्पॅम फोल्डरमध्ये आलेला ईमेल खरा असेल, असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. मात्र तो चक्क खरा निघाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मिशिगन, 3 फेब्रुवारी: अमेरिकेतील (America) एका महिलेला (Woman) तिने 22 कोटी ($3million) रुपयांची लॉटरी (Lottery) जिंकल्याचा एक ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये (Spam Folder) दिसला. तिचे त्या ईमेलकडं लक्ष गेलं आणि त्या मेलचा तिनं पाठपुरावा केला. काही वेळातच हा ईमेल खरा (True) असून आपल्याला खरोखरच 22 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचं तिच्या लक्षात आलं. साधारणपणे स्पॅम फोल्डरमध्ये प्रत्येकाला अशा प्रकारचे ईमेल येत असतात. कधी लॉटरी जिंकल्याचे, कधी जॅकपॉट लागल्याचे तर कधी काही अविश्वनीय ऑफर असल्याचे हे मेल असतात. असं प्रत्यक्षात घडलं तर किती बरं होईल, असं हे ईमेल वाचून सतत वाटत असतं. मात्र स्पॅम फोल्डरमधला ईमेल खरा असल्याचं पाहून सर्वांनाच नवल वाटलं. कोट्यवधींची लॉटरी अमेरिकेतील मिशगनमध्ये राहणाऱ्या 51 वर्षांच्या लॉरा स्पिअर्स हिनं काही दिवसांपूर्वी लॉटरीचं एक तिकीट खरेदी केलं होतं. त्यानंतर आपण तिकीट घेतल्याचं ती विसरूनही गेली होती. मात्र तिला ईमेल अकाउंटवरील सर्व फोल्डर चेक करण्याची सवय होती. त्यात अधूनमधून ती स्पॅममध्ये आलेले ईमेलही तपासून पाहत असे. याच फोल्डरमध्ये तिला एक मेल दिसला. 30 लाख डॉलरची लॉटरी जिंकल्याचा तो ईमेल पाहून तिला तिकीटाची आठवण झाली. तिने तिकीटाचा नंबर तपासून खातरजमा केली आणि तो ईमेल खरा असल्याचं तिच्या लक्षात आलं. मित्राच्या ईमेलमुळे झाली कमाल वास्तविक, लॉराला तिच्या एका सहकाऱ्यानं पाठवलेला ईमेल मिळत नव्हता. वारंवार इनबॉक्स चेक करूनही ईमेल सापडत नसल्यामुळे तिने इतर फोल्डर तपासायला सुरुवात केली. त्यावेळी स्पॅम फोल्डरही तिने तपासलं. त्यातही मित्राचा ईमेल मिळाला नाहीच, मात्र तिने लॉटरी जिंकल्याचा ईमेल मात्र तिला दिसला. हे वाचा- सावधान! ‘हा’ कीडा ठरणार जगाच्या विनाशाचं कारण? शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा कळतंय पण वळत नाही आपण लॉटरी जिंकलीय, हे समजतंय. मात्र जोपर्यंत आपल्याला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आपला या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसणार नाही, असं लॉरा म्हणते. या लॉटरीचं बक्षीस जेव्हा प्रत्यक्षात मिळेल, तेव्हा लॉराचं आयुष्यच बदलून जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या