टेक्सास, 3 फेब्रुवारी : स्पेसएक्सचं एक रॉकेट प्रयोगात्मक प्रक्षेपणादरम्यान क्रॅश झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी टेक्सामधील बोका चिका येथून स्पेसएक्सच्या रॉकेटने उड्डाण केलं. पण रॉकेटने उड्डाण केल्यानंतर काही अंतरावर जाऊन रॉकेट क्रॅश झालं. रॉकेट क्रॅश झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या खासगी अवकाश कंपनीने चंद्र आणि मंगळावर माणसं आणि 100 टन माल वाहून नेण्यासाठी लिफ्ट रॉकेटचं परीक्षण मॉडेल तयार केलं होतं. स्टारशिप एसएन 9 जी रॉकेट शेवटच्या टप्प्यात होतं. परंतु स्पेसएक्सचं स्टारशिप रॉकेट उड्डाण करताच काही अंतरावर पोहचून क्रॅश झालं. स्पेसएक्सच्या लाईव्ह स्ट्रीम कव्हरेजवर निर्दोष लिफ्टऑफ असल्याचं दिसून आलं. परंतु सुमारे 10 किमी उंचीवर पोहचल्यानंतर रॉकेट मध्यभागी थांबलं आणि त्याचं इंजिन बंद पडल्याची माहिती मिळाली. इंजिन बंद पडल्यानंतर रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने परत खाली येण्यास सुरुवात केली. स्टारशिप रॉकेटचं उड्डाण झाल्याच्या 6 मिनिटं आणि 26 सेकंदाच्या अंतरावर रॉकेटमधून धूर येत रॉकेटचा स्फोट होऊन ते वेगाने जमिनीवर येत क्रॅश झालं.
फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने मंगळवारी झालेल्या लँडिंग दुर्घटनेचं निरिक्षण केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.