दक्षिण आफ्रिकेच्या क्वाह्लाथी (KwaHlathi ) गावात हजारो लोक खोदकामात गुंतले आहेत. इथे काही असे दगड सापडल्याचा दावा आहे, जे हिऱ्यासारखे दिसतात. देशभरातून कुदळ-फावडं घेऊन लोकांची झुंबड उडाली आहे. पाहा
दक्षिण आफ्रिकेतल्या एका छोट्या गावात एका महिलेला हिऱ्यासारखे काही दगड जमिनीत सापडले. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोकांनी या ठिकाणी खोदायला सुरुवात केली आहे.
या भागात हिरे असू शकतात असा विश्वास ठेवून हजारो लोक खजिना शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्वाह्लाथी (KwaHlathi) गावात गेले आहेत
एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे, काही विचित्र, अज्ञात दगड सापडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनजवळच्या खेड्यात मोठ्या संख्येने लोक जमले आहेत.
हिरे मिळतील या आशेने लोक - महिला, मुलांसह नशीब यआजमावण्यासाठी दूरवरून कुदळ-फावडी घेऊन येथे या गावात येत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत बेरोजगारीचा दर मोठा आहे. गरिबीही आहे. त्यामुळेच नशीब पालटण्याच्या आशेने क्वाह्लाथी गावामध्ये एक हजाराहून अधिक लोक हिरे शोधण्यासाठी जमीन खोदण्यात गुंतले आहेत
मेंडो सबेलो नावाच्या व्यक्तीने या शोधाला जीवन बदलणारे म्हटले आहे. तो म्हणतो की आता त्याला छोटी कामे करावी लागणार नाहीत आणि त्याचे आयुष्य बदलू शकेल.
दक्षिण आफ्रिकेच्या खनिज संशोधन विभागाने हे हिरे असल्याला अद्याप पुष्टी दिलेली नाहीय भूगर्भशास्त्रज्ञ आणि उत्खनन तज्ज्ञांचं एक पथक इथे पाठवलं जाईल आणि नमुने गोळा करून अभ्यास केला जाईल, असं सरकार सांगत आहे
दगड प्रत्यक्षात हिरे आहेत की नाही हे अद्याप माहीत नसलं तरी लोक जमीन खोदकाम करत आहेत. काहींनी तर इथली माती, दगड विकायलाही सुरुवात केली आहे.
इथल्या दगडांची विक्री देखील सुरू झाली आहे. 100 ते 300 आफ्रिकन रँड म्हणजे (7.29 ते 25 डॉलर) असा दर मातीला मिळतोय.