टोकियो, 15 एप्रिल : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाल्याची घटना घडलीय. पंतप्रधान फुमियो हे भाषण देत असतानाच स्फोट झाला. त्यांच्यावर स्मोक बॉम्बचा हल्ला करण्यात आला. सुदैवाने पंतप्रधान फुमियो यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केलीय. द जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा हे भाषणासाठी गेले असताना हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानतंर आजुबाजुला धूर पसरला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून घटनास्थळी असलेले लोक या प्रकारानंतर भीतीने पळताना दिसत आहेत. सुरक्षा दलाने एकाला ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.
सावधान! मे महिन्यात कोरोना वाढवणार टेन्शन; आतापर्यंत अचूक दावे करणाऱ्या एक्सपर्टचा मोठा खुलासा पंतप्रधान किशिदा या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या एका उमेदवारासाठी भाषण देणार होते. दरम्यान, भाषणाला सुरुवात होण्याच्या काही क्षण आधीच हा स्फोट झाला. माजी पंतप्रधान शिंजो आबेंची हत्या जपानमध्ये दुसऱ्यांदा एखाद्या मोठ्या नेत्याच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आलीय. याआधी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गतवर्षी ८ जुलै रोजी गोळीबार झाला होता. यात शिंजो आबे यांचा मृत्यू झाला. भाषणावेळीच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. ते नारा शहरात भाषण देत होते.