JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेत FedEx सेंटरवर गोळीबार; 4 शीख बांधवांसह 8 जणांचा मृत्यू, हल्लेखोरानं स्वतःवरही झाडली गोळी

अमेरिकेत FedEx सेंटरवर गोळीबार; 4 शीख बांधवांसह 8 जणांचा मृत्यू, हल्लेखोरानं स्वतःवरही झाडली गोळी

Firing at FedEx center: अमेरिकेतील (US) इंडियाना राज्यातील एका फेडेक्स सेंटरवर (Attack on FedEx center) हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाच्या चार शीख बांधवांचा मृत्यू (4 Sikh person death) झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 17 एप्रिल: अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका फेडेक्स सेंटरवर (Attack on FedEx center) हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाच्या चार शीख बांधवांचा मृत्यू (4 Sikh person death) झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 जणांची निर्दयी हत्या केलेल्या 19 वर्षीय आरोपीनं स्वतः वरही गोळी झाडली (Attacker suicide himself) आहे. ब्रँडन स्कॉट असं आरोपीच नाव असून तो इंडियानातील रहिवासी आहे. या गोळीबारामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून संबंधित हल्लेखोर फेडेक्सचा पूर्व कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. इंडियाना राज्यातील संबंधित फेडेक्स सेंटरमध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचं काम करणाऱ्या लोकांमध्ये 90 टक्के लोकं भारतीय- अमेरिकन आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी स्थानिक शीख समुदायातील आहेत. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, शीख समुदायाचे नेते गुरिंदर सिंह खालसा यांनी म्हटलं की, ‘ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून संपूर्ण शीख समुदाय दुःखात आहे. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित हल्लेखोर आरोपी ब्रॅंडन स्कॉट पूर्वी फेडेक्सच्या सेंटरमध्ये काम करत होता. मॅरियन काउंटी कोरोनरच्या कार्यालयानं मृतांची ओळख पटवली असून मृत झालेल्या लोकांची नाव- 32 वर्षीय मॅथ्यू आर. अलेक्झांडर, 19 वर्षीय सामरिया ब्लॅकवेल, 66 वर्षीय अमरजीत जोहल, 64 वर्षीय जसविंदर कौर, 68 वर्षीय जसविंदर सिंह, 48 वर्षीय अमरजीत सेखों, 19 वर्षीय करली स्मिथ आणि 74 वर्षीय जॉन वीसर्ट अशी आहेत हे ही वाचा- एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केलं दुःख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, या संबंधित गोळीबाराच्या घटनेची माहिती मला मिळाली आहे. अंधाधुन केलेल्या या गोळीबाराच्या हिंसाचाराला त्यांनी एक महामारी संबोधलं आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटलं की, ‘बंदुकीतून केलेल्या गोळाबारात अनेक अमेरिकन नागरिकांचा दररोज जीव जात आहेत. यामुळे आपल्या देशाची प्रतिमा कलंकित होतं होतं. अशा प्रकारच्या घटना देशाच्या आत्म्यावर हल्ला करतात, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या