यूक्रेन, 4 जुलै: यूक्रेनमधील (Ukraine) सुरक्षा मंत्रालयाने शुक्रवारी महिला सैनिकांचे काही (Women Soldiers) फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर युक्रेन सरकावर जोरदार टीका केली जात आहे. या फोटोंमध्ये महिला हाय हिल्स (High Heel) म्हणजेच उंच टाचाचे शूज घालून परेड (Parade) करताना दिसत आहेत. या घटनेनंतर विरोधी पक्षाने (Opposition) यूक्रेन सरकारवर निशाणा साधला आहे. सैन्याच्या गणवेशात हाय हिल्स घालून महिलांना परेड करण्यास सांगितल्यामुळे सोशल मीडियावर युक्रेन सरकारवर टीका केली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त परेडचं आयोजन आर्मी युनिफॉर्मसोबत महिलांनी हाय हिल्स घातली होती. आणि महिला युक्रेनच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. युक्रेनला सोवियत संघापासून वेगळं होऊन 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. परेडबाबत मंत्रालयाने इन्फॉर्मेशन साइट ArmiaInform पर कॅडेट इवान्ना मेदविदच्या हवाल्याने लिहिलं आहे की, आज पहिल्यांदा हाय हिल्स घालून परेड करण्यात आली. आर्मी यूनिफॉर्मच्या शूजच्या तुलनेत हाय हिल्समध्ये परेड करणं अवघड आहे, मात्र आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे ही वाचा-
FB वर जुळलं प्रेम; मात्र भारत-पाक सीमा बंद,अखेर तरुणाच्या वडिलांनी केला बंदोबस्त
हे फोटो समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार विरोधी पक्षनेत्या इना सोवसन यांनी फेसबुकवर लिहिलं की, उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावर असे शूट घालून चालल्यामुळे पाय लचकणे किंवा लिगामेंट डॅमेज होण्याची भीती असते. शेवटी महिलांची सुंदर डॉलची प्रतिमा जिवंत करण्याची काय गरज आहे? हाय हिल्समध्ये सराव करणं धोकादायक आहे. सोशल मीडिया युजर्सनेदेखील या फोटोंचा निषेध केला आहे. युक्रेन देशाच्या सशस्त्र दलात 30 हजारांहून अधिक महिला आहेत. ज्यात 4000 हून अधिक अधिकारी पदावर आहेत. तर 7 वर्षांपूर्वी रशिया समर्थ फुटीरतावाद्यांविरोधात 13,500 हून अधिक यूक्रेनी महिला लढल्या आहेत.