JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तानातील धक्कादायक प्रकार; 16 वर्षांच्या शीख मुलीचं अपहरण करुन केलं धर्मांतर, आणि...

पाकिस्तानातील धक्कादायक प्रकार; 16 वर्षांच्या शीख मुलीचं अपहरण करुन केलं धर्मांतर, आणि...

या घटनेनंतर पाकिस्तानातील शीख मुलींच्या सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली जात आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची, 23 जून : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पाकिस्तानातील जाकोबाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या शीख मुलीचं अपहरण करुन तिच्या मनाविरोधात धर्मांतर करुन मुस्लीम तरुणाशी लग्न लावून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय लक्ष्मी कौर हीचं अपहरण करण्यात आलं आहे. तिचं धर्मांतर करण्यात आलं होतं. यापूर्वीही पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी निषेध व्यक्त केला आहे.

17 जून रोजी तिचं धर्मांतर करण्यात आलं होतं. त्यानंतर तिचं वझिर हुसैन चांदियो या मुलाशी लग्न लावून देण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान चीनसोबत सीमावाद ताजा असतानाच आता पाकिस्तानसोबतचाही (Pakistan) तणाव वाढत आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतल्या (Delhi) पाकिस्तानी दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर इस्लामाबादमधल्या भारतीय दुतावासातल्या (Indian Ambisi) कर्मचाऱ्यांची संख्याही 50 टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्य भारतीय दुतावासातल्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना काही तास ताब्यातही घेण्यात आलं होतं. हे वाचा- IDEO : मुसळधार पावसात नदीत अडकले 4 लहानगे; 5 तास सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासातले कर्मचारी हे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा संशय परराष्ट्रमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या