रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे वेगवेळ्या कारणाने चर्चेत असतात. पुतिन हे तसं गूढ व्यक्तिमत्त्व. कधी बर्फाळ पाण्यात डुंबताना तर कधी घोडेस्वारी करतानाचे त्यांचे फोटो यापूर्वी आले आहेत. लेटेस्ट आहेत जंगल सफारीचे (Putin jangal safari) पाहा काही VIRAL PHOTOs
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आपल्या फिटनेस आणि विचित्र छंदांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते आता सायबेरियात (Vladimir Putin In Siberia) आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. यादरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.
सैबेरिया दौऱ्यात आपल्या व्यग्र कामकाजातून थोडासा विरंगुळा म्हणून पुतिन यांनी छोटी सुट्टी घेत जंगल सफारीचा आनंद लुटला. क्रेमलिननेच त्यांचे हे फोटो समोर आणले आहेत.
काही दिवसांपूर्वी पुतिन यांच्या कार्यालयातील लोकांना कोरोना झाल्याचा बातम्या आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी ताजिकिस्तानमधील आपला नियोजित कार्यक्रम रद्द केला होता.
व्लादिमीर पुतिन यांची अशा सफरीची ही काही पहिलीच वेळ नाही. ते कधी घोड्यावर स्वार झाल्याचे तर कधी बर्फाळ पाण्यात अंघोळ करतानाचे फोटो याआधी Viral झालेले आहेत.
पुतिन दिवसापेक्षा रात्री जास्त सक्रिय असतात. ते आपलं बरेचसं काम रात्री उशिरापर्यंत जागून करतात. त्यामुळे ते जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहेत.
पुतिन यांना घोडेस्वारीचीही खूप आवड आहे. त्यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सायकल चालवायलाही आवडते.
पुतीन आपल्या आपल्या आहाराला फार महत्त्व देतात. सकाळी नाश्त्यासाठी पुतिन अंडी आणि फळांचा रस घेतात.