JOIN US
मराठी बातम्या / विदेश / व्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला केलं गायब? तर्क-वितर्कांना उधाण

व्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला केलं गायब? तर्क-वितर्कांना उधाण

या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या पँडोरा पेपर्स लीकमध्ये स्वेतलाना (Pandora Papers leak) यांचेही नाव समोर आले होते.

जाहिरात

Luiza Krivonogikh (Photo: Twitter_pleasesaveour)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 23 डिसेंबर : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. आता तर त्यांनी आपल्या कथित मुलीला (Putin’s daughter form girlfriend) गायब केल्याचं म्हटलं जात आहे. लुइजा क्रिवोनोगिख (Luiza Krivonogikh) असं या मुलीचं नाव आहे. ती पुतीन यांची गर्लफ्रेंड स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) हिची मुलगी आहे. लुइजाने आपल्या आईच्या पेंटहाउसबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर दोन महिन्यांपासून तिचा कसलाही ठावठिकाणा लागत नाहीये. या सोशल मीडिया पोस्टबाबत नाराज होऊन पुतीन यांनीच तिला गायब (Putin angry with so called daughter) केल्याचे म्हटलं जात आहे. झी न्यूज ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वेतलाना या एक स्वच्छता कर्मचारी होत्या. पुतीन यांची गर्लफ्रेंड झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये अचानक वाढ झाली होती. या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या पँडोरा पेपर्स लीकमध्ये स्वेतलाना (Pandora Papers leak) यांचेही नाव समोर आले होते. यात सांगितले होते, की लुइजाच्या जन्मानंतर लगेच स्वेतलाना (Svetlana in Pandora Papers) माँटे कार्लो येथील तब्बल 3.1 मिलियन पौंड किंमतीच्या पेंटहाउसमध्ये (Luzia penthouse post) शिफ्ट झाल्या होत्या. यामुळेच लुइजा ही पुतीन यांची मुलगी असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, पुतीन यांनी हे सगळं थोतांड असल्याचे म्हणत, माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर रहावं असं स्पष्ट केलं होतं. वाचा :  लैंगिक संबंधानंतर युवकाने केलं ब्लॉक; बदला घेण्यासाठी तरुणीचा भलताच प्रताप दरम्यान, स्वेतलाना यांच्या संपत्तीमध्ये (Svetlana Krivonogikh property) महागड्या ठिकाणी फ्लॅट, मॉस्कोमध्ये काही प्रॉपर्टी आणि एका आलिशान क्रूझचाही समावेश आहे. या सगळ्याची एकूण किंमत सुमारे 100 मिलियन डॉलर्स असल्याचे पँडोरा पेपर्समध्ये म्हटलं होतं. या सगळ्यात लुइजा कायम आपल्या आलिशान लाईफस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर (luiza Krivonogikh Instagram) पोस्ट करत असल्यामुळे पुतीन हे पहिल्यापासून तिच्यावर नाराज होते. एकूणच, पँडोरा पेपर्समधून स्वेतलाना यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे असल्याचा पुरावाच एक प्रकारे लुइजा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून देत होती. 1 ऑक्टोबरला लुइजाने आपल्या पेंटहाउसचा फोटो इन्स्टाग्रामवर (luziaroz) पोस्ट केला होता. यानंतर ना सोशल मीडियावर तिची कोणती पोस्ट दिसली, ना तिच्याबाबत कोणाला काही अपडेट मिळाला. पेंटहाउसची पोस्ट (Putin Daughter Instagram) पाहून पुतीन यांनीच लुइजाला गायब (Putin’s daughter missing) केल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. पुतीन यांचा स्वभाव आणि पँडोरा पेपर्सचे गांभीर्य पाहता या आरोपांमध्ये बरंच तथ्यही असू शकतं. अर्थात, खरं खोटं पुतीनच जाणे!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या