JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Russia-Ukraine War: पंतप्रधान मोदींचा दुसऱ्यांदा पुतिन यांना फोन, 25 मिनिटांच्या चर्चेत काय झालं बोलणं?

Russia-Ukraine War: पंतप्रधान मोदींचा दुसऱ्यांदा पुतिन यांना फोन, 25 मिनिटांच्या चर्चेत काय झालं बोलणं?

Russia-Ukraine War:मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली आहे. त्यावर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. खार्किवमध्ये अजूनही मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यातच रशियानं खार्किव ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल पीएम मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी रशियन सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या एका टीमला विशेष कॉरिडॉरद्वारे ताबडतोब बाहेर काढून रशियाला पाठवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना लवकर आणि सुरक्षितपणे भारतात परत पाठवता येईल, असही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेन सरकारवर भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे. रशियन रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनकडून भारतीय विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेन युद्धाची ही दुसरी वेळ आहे, जेव्हा चर्चा झाली. युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याशी पहिल्यांदा बोलले तेव्हा त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा आग्रह धरला होता. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतण्याबाबतही चर्चा केली. पहिल्यांदाच पीएम मोदी आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनमधील ताज्या परिस्थितीची माहिती दिली. 17 हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले दरम्यान ऑपरेशन गंगा अंतर्गत भारत सरकार युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, भारत सरकारनं आतापर्यंत 17 हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही लवकरच मायदेशी आणलं जाईल, असा दावा परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या