Russia-Ukraine War: रशियाकडून युक्रेनच्या विमानतळांवर बॉम्बहल्ले, भयंकर VIDEO आला समोर
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची (Russia-Ukraine War) घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरांत बॉम्बहल्ले (explosion in various parts of Ukraine) करण्यात येत आहेत. युक्रेनमधील विविध भागांत भीषण स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाकडून युक्रेनमधील विविध भागांत बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान युक्रेनमधील विविध ठिकाणी एअरबेसवर रशियाकडून हल्ला करण्यात येत असल्याचं वृत्त समोर येत आहे. या परिस्थितीची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी सैन्याला कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहेत. ताज्या माहितीनुसार, रशियन सैन्याने सांगितले की, युक्रेनच्या विमानतळावर आणि हवाईतळांवर हल्ला करण्यात आला आहे.
न्यूज एजन्सी एफपीनुसार, रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव येथे मोठ्या स्फोटांचा आवाज येण्यास सर्वप्रथम सुरुवात झाली. रशियाने केलेल्या या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी म्हटलं, संपूर्ण जगाने एकत्र येत रशियाच्या या हल्ल्याला रोखलं पाहिजे. वाचा : Russia-Ukraine: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेल दराचा भडका युक्रेनचा रशियावर पलटवार रशियाकडून करण्यात येत असलेल्या या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने रशियाचे पाच लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलेली ही कारवाई पूर्व युक्रेनमध्ये करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. वाचा : Ukraine-Russia War: रशियाचे पाच फायटर आणि एक हेलिकॉप्टर उडवलं, युक्रेन लष्कराचा दावा रशियाने युक्रेनमधील दोन गावे केली काबीज रशियन सैन्याने युक्रेनमधील दोन गावे काबीज केली असल्याचंही मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर काय होणार परिणाम? रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. भारतीय शेअर बाजारही याला अपवाद नाही. युद्धाच्या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे. कोरोना संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या मंदीच्या वातावरणाचा फटका बसणार आहे. पेट्रोल -डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशभरात पेट्रोल (Petrol Diesel rates) आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे हे दर आणखी वाढणार आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो आणि तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम चालू खात्यातील तुटीवर होऊ शकतो.