नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाची शक्यता आणखीन दाट होत चालली आहे. युक्रेनच्या सीमेवर 1 लाख 30 हजाराहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच रशियाने रणगाडे, अवजड शस्त्रे आणि क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत. रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे म्हणणे आहे की, 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला (attack on Ukraine) होऊ शकतो. अमेरिका आणि युरोपीय देशांकडून रशियावर निर्बंध लादण्याचे इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान त्याचा रशियावर परिणाम होत नाही. रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशीही चर्चा केली. मुंबईत राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेतून असा बचावला तरुण, खतरनाक Live Video व्हायरल युक्रेनच्या सीमेवर 1 लाख रशियन सैनिक तैनात असल्याची माहिती अमेरिकन अधिकार्यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. मात्र आता अधिकार्यांचे म्हणणे आहे की, 1 लाख 30 हजारांहून अधिक रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर उभे आहेत. यापैकी 1.12 लाख सैनिक लष्कराचे आहेत तर 18 हजार नौदल आणि हवाई दलाचे आहेत. दरम्यान रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरलं असल्याचं सीएनएनच्या वृत्तात म्हटलं आहे. दक्षिणेला क्रिमिया आणि उत्तरेला बेलारूसने वेढलेले आहे. त्याचबरोबर रशियानंही युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केले आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असे अमेरिकेच्या अहवालात म्हटले आहे. या तीन ठिकाणांहून रशियानं घातला युक्रेनला वेढा पूर्व युक्रेन: डोनेत्स्क आणि लुहान्स्कमध्ये रशियन समर्थित फुटीरतावादी 2014 पासून उपस्थित आहेत. CNN ने उपग्रह प्रतिमांच्या आधारे येलन्या येथील रशियन सैन्याचा लष्करी तळ रिकामा केल्याचे वृत्त दिले आहे. 2021 च्या उत्तरार्धात या लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि शस्त्रे आणण्यात आली होती, ज्यात 700 रणगाडे, वाहने आणि बॅलेस्टिक मिसाईल लॉन्चरचा समावेश होता. आता त्यांना लष्करी तळावरून नेऊन युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. बेलारूस: रशिया आणि बेलारूस यांच्यात जवळचे संबंध आहेत. गेल्या आठवड्यापासून रशिया आणि बेलारूसच्या सैन्याने 10 दिवसांसाठी युद्ध सराव सुरू केला आहे. यामध्ये 30 हजारांहून अधिक रशियन सैनिक सहभागी झाले आहेत. रशियन सैन्यासह, बेलारूसमध्ये SU-35, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि S-400 हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक लढाऊ विमाने तैनात आहेत. रशियाचे सैन्य बेलारूसमार्गे युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बेलारूस आणि कीवमधील अंतर 150 किमी आहे. आईला शिवी दिल्याचा राग; जीवलग मित्राचा केला खेळ खल्लास, भररस्त्यात पाडलं रक्ताच्या थारोळ्यात क्रिमिया: एकेकाळी युक्रेनचा भाग असलेला क्रिमिया 2014 पासून रशियाच्या ताब्यात आहे. CNN च्या वृत्तानुसार, उपग्रह प्रतिमांवर आधारित, 550 हून अधिक लष्करी तंबू आणि शेकडो वाहने क्राइमियाची राजधानी सिम्फेरोपोलच्या उत्तरेकडे आली आहेत. क्रिमियाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवरील स्लाव्हेन शहराजवळ चिलखती वाहने देखील तैनात आहेत. त्याचवेळी रशियाच्या अनेक युद्धनौका क्राइमियाचे मुख्य बंदर सेवास्तोपोल येथेही पोहोचल्या आहेत. याशिवाय रशियाने काळ्या समुद्रात 6 युद्धनौकाही तैनात केल्या आहेत. युक्रेनची तयारी काय आहे? युक्रेनबरोबरच अमेरिका, ब्रिटन आणि नाटोसह युरोपीय देश आहेत. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेस्की रेझनिकोव्ह यांनी ट्विट केले आहे की, आतापर्यंत 1,500 टन लष्करी साहित्य सापडले आहे. यामध्ये शस्त्रे, ग्रेनेड आणि दारूगोळा यांसारख्या लष्करी साहित्याचा समावेश आहे.