नवी दिल्ली : पाकिस्तानी समाजसेवी बिलकिस बानो इदी (Bilkis Bano Idi) यांचे शुक्रवारी कराचीमधील एका खासगी रुग्णलयात निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. बिलकिस बानो इदी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी शोक व्यक्त केला. बिलकिस (who is Bilkis Bano Idi) आपले पती समाजसेवक दिवंगत अब्दुल सत्तार इदी यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम करत होत्या. त्यांचा मुलगा फैसल ईदी याने त्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी काय म्हणाले? पंतप्रधान मोदी यांनी बिलकिस बानो यांना श्रद्धांजली वाहिली. ट्विट करत ते म्हणाले की, “बिल्किस ईदी यांच्या निधनाबद्दल माझे मनःपूर्वक शोक. मानवतावादी कार्यासाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाने जगभरातील लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला. भारतातील लोकही त्यांची प्रेमाने आठवण काढतात. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.'
पीएम मोदींसोबत भारतीय उच्चायुक्तांनीही बिल्किस बानो ईदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनानंतर इदी फाऊंडेशनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, त्या अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. तर बिलकिस यांच्या निधनानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा - RSS कार्यकर्त्याची हत्या, बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 20 वेळा वार
कोण आहेत बिलकिस बानो इदी - बिलकिस यांनी अब्दुल सत्तार ईदी फाऊंडेशन नावाच्या कल्याणकारी संस्था स्थापन करण्यासाठी आपल्या पतीसोबत काम केले. या फाऊंडेशनने अनेक क्षेत्रात मानवतावादी कार्यासाठी जगभरात ख्याती मिळवली आहे. 1986 मध्ये बिलकिस बानो यांना त्यांच्या पतीसह रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर बिलकिस बानो ईदी यांना 2015 मध्ये मदर तेरेसा मेमोरियल इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
भारताच्या गीताला घेतले होते दत्तक -
बिलकिस बानो यांना भारतातील गीताच्या आईच्या स्वरुपातही ओळखले जाते. लाहोरमध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये मिळालेल्या आठ वर्षांच्या दिव्यांग मुलगी गीता बिलकिस यांनी दत्तक घेतले होते. यांनतर गीताला 2015मध्ये भारतात वापस आणले गेले होते.