JOIN US
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक! लसीचे 4 डोस घेऊनही लस निर्मात्यांनाच कोरोनाची लागण

धक्कादायक! लसीचे 4 डोस घेऊनही लस निर्मात्यांनाच कोरोनाची लागण

कोरोनाची लस तयार करणारी कंपनी Pfizerचे CEO अल्बर्ट बोर्ला यांना लस घेऊन कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) संसर्ग ओसरला असून, रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. परंतु जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. अनेक दिग्गज मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी जिल बायडन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. आता तर कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला (Pfizer CEO Albert Bourla) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आले आहे. परंतु, बोर्ला यांना सौम्य लक्षणं आहेत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. राष्ट्रपती जो बायडन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 79 वर्षांच्या बायडन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नाक वाहणं, थकवा येणं आणि कोरडा खोकला अशी लक्षणं जाणवत होती. त्यांना अँटिव्हायरल पॅक्सलोव्हिडचे (Paxlovid) उपचार देण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे बायडन यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस (Vaccine Dose) घेतले आहेत, तरी त्यांना या आजाराची लागण झाली. गेल्या मंगळवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर या सोमवारी (15 ऑगस्ट 22) जिल बायडेन यांचीही चाचणी निगेटिव्ह आली. पण पुन्हा त्याच सायंकाळी त्यांना सर्दीसारखी सौम्य लक्षणं दिसू लागली. त्यामुळे त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली, तो रिपोर्टही निगेटिव्ह आला, मात्र त्यांची पुन्हा केलेली आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी (15 ऑगस्ट 22) त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दिली. तसंच त्यांना सौम्य लक्षणं आहेत, असंही सांगितलं. बोर्ला यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केलंय. त्यात म्हटलं आहे की, ‘मला जनतेला सांगायचं आहे की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आयसोलेशनमध्ये आहे आणि खबरदारी घेण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलत आहे.’ पुढे त्यांनी म्हटलं, ‘मी आभारी आहे की मी फायझर बायोटेक लसीचे चार डोस घेतले आहेत आणि आता मला कोरोनाचा संसर्ग होऊनही लक्षणं कमी आहेत, त्यामुळे मला बरं वाटतंय. मी Paxlovid घेणं सुरू केलं आहे.’ यूएसमध्ये, FDA ने डिसेंबर 2021 मध्ये आपत्कालीन वापरासाठी Paxlovid ला मान्यता दिली. Paxlovid चा वापर सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी केला जातो. या औषधाचा वापर 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी केला जाऊ शकतो. बायडन यांनाही संसर्ग झाल्यानंतर हेच औषध देण्यात आलं होतं. दरम्यान, लसीचे दोन आणि चार डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. काहींना सौम्य तर काहींना तीव्र लक्षणं दिसत असून कोरोना संपत चाललाय असं वाटत असताना ही बाब चिंता वाढवणारी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या