JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; चक्क दुकानातल्या हॅट आणि चॉकलेटवर मारला डल्ला

पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; चक्क दुकानातल्या हॅट आणि चॉकलेटवर मारला डल्ला

पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा कॅमेऱ्यात कैद. पाक दूतावासातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हातचलाखी करत दुकानातल्या चॉकलेट आणि हॅटवर डल्ला मारल्याचं वृत्त आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सेऊल (दक्षिण कोरिया), 28 एप्रिल : चोरीच्या अनेक घटना आपण आसपास पाहत असतो. चोरी करण्यासाठी चोरांनी लढवलेली शक्कल, चोरी केलेल्या वस्तूंची किंमत, चोरीची पद्धती याबाबत ऐकताना आणि वाचताना आश्चर्यचकित व्हायला होतं. परंतु, एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुकानात जाऊन हातचलाखीने चोरी केल्याचं आपण क्वचितच कधी ऐकले असेल. परंतु,अशी घटना खरोखरच दक्षिण कोरियात (South Korea)घडली आहे. येथील एका शहरात पाकिस्तानी दूतावासातील (Pakistan Embassy)अधिकाऱ्यांनी चक्क चॉकलेट (Chocolete)आणि हॅट (Hat)हातचलाखी करुन लांबवले. ही घटना उघडकिस आली मात्र आंतरराष्ट्रीय करारामुळे त्यांच्यावरील केसची फाईल बंद करण्यात आली. पाकिस्तानी दूतावासातील दोन मुत्सद्दी अधिकाऱ्यांना सेऊल (Seol)येथील एका दुकानात चोरी (Shoplifiting)करताना पकडण्यात आल्याचं पोलिसांनी शनिवारी सांगितलं. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,या दोघांना योंगसन जिल्ह्यातील इटयॉनमधील एकाच दुकानातून वेगवेगळ्या वेळी 11,000 वॉन (10 यूएस डॉलर) आणि 1900 वॉन (1.70 युएस डॉलर) किंमतीच्या वस्तुंची चोरी करताना पकडण्यात आलंअसंयोंगसन पोलिस स्टेशनने सांगितल्याचे कोरिया टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाही घेणार मोठा निर्णय! भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदीचा विचार कोरिया टाईम्सच्या वृत्तानुसार,यातील एका आरोपीने 10 जानेवारीला या दुकानातून 1900 वॉन (1.70 युएस डॉलर) किमतीची चॉकलेट चोरली. त्यानंतर 23 फेब्रुवारीला दुसऱ्या आरोपीने त्याच दुकानातून 11,000 वॉन म्हणजे 10 युएस डॉलर किमतीची हॅट चोरली. हॅट चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानातील कामगाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी (Law Enforcement Officers)सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवली. त्यात हे चोर म्हणजे पाकिस्तानच्या दुतावासातील 35 वर्षीय मुत्सद्दी अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठा खुलासा: चिनी सैन्याच्या गुप्त योजनेसाठी वुहान लॅबने केली कोरोनाची उत्पत्ती परराष्ट्र संबंधाविषयक झालेल्या व्हिएन्ना करारानुसार मुत्सदी, त्यांचे नातेवाईक यांना यजमान देशाने काही कायद्यानुसार अटक किंवा अटकेची कारवाई तसेच दोषी ठरवण्याचे टाळावे असे ठरले आहे. त्यामुळेदुतावासातीलअधिकाऱ्यांच्या विरोधामुळे तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी संशयितांची नोंद न घेता ही केस बंद केली. अशा प्रकारच्या घटना जागतिक स्तरावर उघडकीस येत नाहीत किंवा दाबल्या जातात. चोरी करणारी व्यक्ती पाकिस्तान सरकारची अधिकारी असल्यामुळे ती बचावली असली तरीही अशा कृत्यांमुळे आणि तेही एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी केल्यामुळे देशाची नाचक्की होते हे मात्र नक्की.आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठाही कमी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या