JOIN US
मराठी बातम्या / विदेश / वादग्रस्त TikTok वर दिसणार पाकिस्तानचे अध्यक्ष, 'या' प्रकारचे करणार VIDEO

वादग्रस्त TikTok वर दिसणार पाकिस्तानचे अध्यक्ष, 'या' प्रकारचे करणार VIDEO

पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी (Pakistan President Arif Alvi) हे टिकटॉकवर दाखल झाले आहेत. स्वत: राष्ट्रपतींनीच ही माहिती दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै : चिनी सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉर (TikTok) भारतामध्ये बंदी आहे. जगातील अनेक देशांमध्ये टिकटॉकमुळे वाद निर्माण झाले आहेत. चीनचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या पाकिस्तानमध्ये यावर अनेकदा बंदी घातली आहे तसंच नंतर काही दिवसांनी उठवण्यात आलीय. पाकिस्तानमध्येही काही जणांचा या अ‍ॅपला विरोध आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी (Pakistan President Arif Alvi) हे टिकटॉकवर दाखल झाले आहेत. स्वत: राष्ट्रपतींनीच ही माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अल्वी यांचा हा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्वींनी टिकटॉकवर येण्याचं कारण सांगितलं आहे. ‘पाकिस्तानचे राष्ट्रपती आता TikTok वर येत आहेत. पाकिस्तानी तरुणांमध्ये सकारात्मकता, आणि प्रेरणा देणारे संदेशांचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही व्हिडीओ बनवणार आहोत.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानच्या मंत्र्यांचा होता विरोध यापूर्वी सिंध हायकोर्टानं टिकटॉकवर बंदी घातली होती. कोर्टाच्या या निर्णयाचा पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी विरोध केला होता. पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर न्यायालयीन सुधारणा झाल्या नाहीत तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा दावा चौधरींनी ट्विटरवर केला होता. 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; आरोपीनं पायावर लिहिलेला मजकूर वाचून पोलिसही गोंधळले ‘न्यायालयीन सुधारणा झाल्या नाहीत तर पाकिस्तान कधीही आर्थिक संकटातून बाहेर येणार नाही. मी टिकटॉकवरील बंदी आणि एनबीपी अध्यक्षांना हटवण्याच्या निर्णयामुळे हैराण आहे. आमचे सरकार काय करत आहे?’ असा प्रश्न चौधरी यांनी ट्विट करत विचारला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या