इस्लामाबाद, 8 एप्रिल: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या बलात्काराबाबतच्या संतापजनक वक्तव्याचा वाद वाढत चालला आहे. जगभरातून इम्रान खान यांच्यावर याबाबत टीका होत आहे. इम्रान खान यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ (Jemima Goldsmith) यांनीही या विषयावर इम्रान यांना सुनावलं आहे. जेमिमा यांनी कुराणाचा दाखला देत पुरुषांनी बुरखा घालावा असा सल्ला दिला आहे. जेमिमा यांनी ट्विट करत इम्रान खानवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी कुराणाचा दाखला देत बुरख्यात राहण्याची जबाबदारी पुरुषांची असल्याचा दावा केला आहे. “तुमच्या समर्थकांना सांगा की डोळ्यावर संयम ठेवण्यासाठी तुमचे प्रायव्हेट पार्ट बुरख्यामध्ये ठेवा.” मी ज्या इम्रान खान यांना ओळखत होते त्यांचं पुरुषांच्या डोळ्यावर बुरखा असावा असं मत होतं, असा दावा देखील जेमिमा यांनी केला आहे. जेमिमा या इम्रान खानच्या पहिल्या पत्नी आहेत.
इम्रान खान यांची दुसरी पत्नी रेहम खान (Reham Khan) यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी इम्रान खान यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे. इम्रान खान यांचे संतापजनक वक्तव्य वाढत्या अश्लीलतेला युरोप (Europe) आणि भारत (India) हे देश कारणीभूत आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांनी जनतेशी थेट संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. ( लग्नाच्या दिवशीच locha झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा ) “प्रलोभनापासून वाचण्यासाठी आपल्याला बुरखा प्रथेला प्रोत्साहन दिले पाहिजे. दिल्लीला बलात्काराची राजधानी समजलं जातं तर युरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी अश्लीलता कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.” असं वक्तव्य इम्रान यांनी केलं होतं.