काबूल, 17 एप्रिल: पाकिस्ताननं (Pakistan) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) हवाई हल्ला (Airstrike) केला आहे. या हल्ल्यात लहान मुलांसह 40 हून अधिक अफगाण नागरिक (Afghan civilians) ठार झाले आहेत. अफगाण शांतता वॉचडॉगचे संस्थापक हबीब खान (Habib Khan) यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी विमानांनी शुक्रवारी रात्री खोस्त आणि कुनार प्रांताच्या विविध भागात हल्ले केले. ट्विटरवर या घटनेचा निषेध करताना खान म्हणाले, “पहिल्यांदाच तालिबानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी लष्करी विमानांनी अफगाण भूमीवर बॉम्बफेक करून 40 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. दरम्यान पाकिस्तान आपल्या प्रॉक्सी फोर्स, तालिबान आणि मुजाहिदीन यांच्यामार्फत अनेक दशकांपासून अफगाण लोकांना मारत आहे. खान यांनी या घटनेत ठार झालेल्यांच्या मृतदेहांचा फोटोही शेअर केला आहे. अफगाणिस्तानातील पाकिस्तानी युद्धगुन्ह्यांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडे केलं आहे. खोस्त आणि कुनार प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी पुष्टी केली की पाकिस्तानी विमानांनी प्रांतांच्या विविध भागांवर हवाई हल्ले केले. या घटनेनंतर तालिबानने पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांनाही बोलावून घेतलं. काबूलमधील पाकिस्तानी राजदूताला घेतलं बोलावून देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि कार्यवाहक उप संरक्षण मंत्री अलहाज मुल्ला शिरीन अखुंद या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. त्यात ट्विट करण्यात आलं आहे की, काबूलमधील पाकिस्तानच्या राजदूताला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात बोलावण्यात आलं. IEA परराष्ट्र मंत्री मावलवी अमीर खान मुत्ताकी यांच्यासोबत, या सत्राला उप संरक्षण मंत्री अल्हज मुल्ला शिरीन अखुंद यांनीही हजेरी लावली होती, जिथे अफगाणिस्तानने याचा निषेध केला. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे स्पष्ट उल्लंघन विश्लेषकांच्या मते, हे हल्ले पाकिस्तानचा थेट हस्तक्षेप आणि अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन दर्शवतात. अहवालानुसार, राजकीय विश्लेषक सादिक शिनवारी म्हणाले, खोस्त आणि कुनारमध्ये (ड्युरंड रेषेवर) पाकिस्तानी सैन्यानं केलेले हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाया हे अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचे स्पष्ट उल्लंघन आणि हस्तक्षेप आहे.