JOIN US
मराठी बातम्या / विदेश / या पंतप्रधानांनी लिव्ह इनमध्ये असताना दिला बाळाला जन्म; आता देशहितासाठी ऐनवेळी रद्द केलं बॉयफ्रेंडसोबतचं लग्न

या पंतप्रधानांनी लिव्ह इनमध्ये असताना दिला बाळाला जन्म; आता देशहितासाठी ऐनवेळी रद्द केलं बॉयफ्रेंडसोबतचं लग्न

कोरोनाच्या (Corona)वाढत्या प्रादुर्भावामुळे न्यूझीलंड(New Zealand) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न(New Zealand Prime Minister Jacinda Ardern) यांनी कोरोनाची परिस्थीती पाहता आपले लग्न रद्द कराव लागलं आहे.

जाहिरात

Jacinda Ardern

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंगटन, 23 जानेवारी: न्यूझीलंड (New Zealand) सरकारने ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न(New Zealand Prime Minister Jacinda Ardern) यांनी कोरोनाची परिस्थीती पाहता आपले लग्न रद्द कराव लागलं आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी आपल्या देशाला ‘कोरोनामुक्त’ जाहीर केले होते. तिथले जीवनमान सुरळीत झालेही होते. पण, थोड्याच काळानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये करोना पार्श्वभूमीवर नव्या निर्बंधांची घोषणा करतानाच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपण आपलं लग्न रद्द करत असल्याचीही घोषणा केली. नव्या निर्बंधांनुसार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला 100 संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. आपलं लग्न रद्द करण्याच्या निर्णयानंतर जेसिंडा म्हणाल्या, देशातले अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत. मी त्याबद्दल त्यांची माफी मागते. पंतप्रधान जेसिंडा यांनी रविवारी या महिन्याच्या सुरुवातीला ऑकलंडला लग्नामध्ये एकाच कुटुंबात ओमिक्रॉनची लागण झालेली 9 रुग्णे आढळले. त्यानंतर न्यूझीलंडमधील नागरिकांना नविन व्हरिएंटच्या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे, अशी घोषणा केली होती. अनेक वर्षांपासून त्या बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. 2019 मध्ये जेसिंडा आणि क्लार्क यांनी एंगेजमेंट केली होती. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असताना जेसिंडा अर्डर्न यांनी बाळाला जन्म दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या