न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन
वेलिंग्टन, 7 नोव्हेंबर: न्यूझीलंडमध्ये अखेर (New Zealand approves law for assisted dying) इच्छामरणाचा कायदा लागू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्याबाबत न्यूझीलंडमध्ये चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच याबाबत जनमत (Public opinion in favor of assisted dying) घेण्यात आलं होतं. यात बहुतांश नागरिकांना इच्छामरणाऱ्या कायद्याच्या बाजूनं मतदान केल्यामुळे हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. इच्छामरणाला परवानगी मात्र एक अट न्यूझीलंडमध्ये आता नागरिक इच्छामरमासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी एक अट निश्चित करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला दुर्धर असा आजार असेल आणि त्या आजाराने पुढील सहा महिन्यांत व्यक्तीचा मृत्यू निश्चित असेल, केवळ अशाच व्यक्तींना इच्छामरणाचा कायदा वापरता येईल. इतर कुणालाही हा कायदा वापरता येणार नाही. ज्या नागरिकांचा एखाद्या आजाराने मृत्यू अटळ आहे, त्यांना वेदना सहन करत करत मृत्यू येण्याऐवजी शांततेनं मृत्यूला सामोरं जाता यावं, यासाठी हा कायदा तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन डॉक्टरांची परवानगी अत्यावश्यक व्यक्तीला इच्छामरण देण्यापूर्वी ती व्यक्ती दुर्धर आजाराची ठरलेली अट पूर्ण करत असल्याबाबत दोन डॉक्टरांचं सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतरच या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. अनेक दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना यामुळं दिलासा मिळाला असन वेदना सहन न करता शांतपणे झोपेत मृत्यूला कवटाळणं शक्य होणार असल्याचं ते सांगतात. किती लोकांना मिळणार परवानगी? न्यूझीलंडमध्ये 950 लोक यासाठी अर्ज करू शकतील आणि त्यापैकी 350 लोकांना इच्छामरण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबत अद्याप निश्चित अंदाज येत नसला तरी याचा फायदा अनेक नागरिकांना होईल, असं सांगितलं जात आहे. हे वाचा- SBI मध्ये खाते असणाऱ्यांना मिळणार दोन लाखांचा लाभ, काय आहे योजना? वाचा सविस्तर या देशात परवानगी भारतात अद्याप इच्छामरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र जगभरातील काही प्रगत देशांनी कायदा करून इच्छामरणाला कायद्याच्या कोंदणात बसवलं आहे. यामध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्पेन, कोलंबिया, लग्जमबर्ग, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड यासारख्या देशांचा समावेश आहे.