JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Myanmar News: म्यानमारमध्ये पुन्हा लष्काराचा सत्तेवर कब्जा, एका वर्षासाठी देशावर ताबा !

Myanmar News: म्यानमारमध्ये पुन्हा लष्काराचा सत्तेवर कब्जा, एका वर्षासाठी देशावर ताबा !

भारताच्या सर्वात जवळ असलेल्या म्यानमारमध्ये एक दशकभरापूर्वी लष्करी सत्तेचा पाडवा करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

म्यानमार, 01 फेब्रुवारी : म्यानमार  (Myanmar Latest News) मध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. लष्कराने उठाव करत सत्ता काबीज केली आहे. स्टेट काउंसलर आंग सान सू की (Aung San Suu Kyi Detained) यांना नजरकैद करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.  आंग सान सू की आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार येथील स्थानिक वेब पोर्टल म्यानमार नाऊने आंग सान सू की यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले आहे. तसंच त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा ताब्यात घेतले आहे.  परंतु, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही तसंच म्यानमारमधील सैन्याच्या टीव्ही चॅनलने सांगितले की, सैन्याने एका वर्षासाठी देशाची सूत्र आपल्या हातात घेतली आहे. म्यानमारमधील नेपीडॉमध्ये सर्व दळणवळणाची साधणे बंद करण्यात आली आहे. सर्व दूरसंचार प्रणाली बंद करण्यात आली आहे. नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसी पार्टीच्या सदस्यांना एकमेकांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताच्या सर्वात जवळ असलेल्या म्यानमारमध्ये एक दशकभरापूर्वी लष्करी सत्तेचा पाडवा करण्यात आला आहे. 50 वर्षांपर्यंत देशात सैन्याचे शासन राहिले होते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि त्यात सत्ताधी एनएलडी पक्षाचा पराभव झाला होता. दरम्यान, सैन्याने सत्तापालट केल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. काही राजदुतांनी म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्याची शक्यता वर्तवली होती. पण, सैन्याकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.  सैन्याचे कमांडर इन चीफ सीनियर जनरल मिन आंग लाइंग यांचं विधान चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. आंग सान सू की यांचा सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टी (NLD) सैनाच्या या खुलाश्यावर समाधान व्यक्त केले होते, पण आता म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्याचे वृत्तसमोर आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या